The Altar of Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने: The blood of sacrifices put on the horns and poured at the foot of
The blood of sacrifices put on the horns and poured at the foot of बद्दल वचने
गोर्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.
त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना ते लावावे व राहिलेले रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.
मग मोशेने त्या गोर्ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली.