मुख्य मजकुरावर जा

The Altar of Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने

150 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारापुढे, सभामंडपापुढे होमार्पणाची वेदी ठेवावी.

  2. मग होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे यांचा अभिषेक करावा; वेदीला पवित्र करावे म्हणजे ती वेदी परमपवित्र होईल.

  3. मग मोशेने निवासमंडपाच्या, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होमार्पणाची वेदी ठेवली व त्यावर होमार्पण व अन्नार्पण केले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  4. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी वेदीवर जळत असलेल्या लाकडांवर त्या पशूचे तुकडे, शिर व चरबी यासह व्यवस्थित रचून ठेवावी.

  5. पाय व आतडी पाण्याने धुऊन याजकाने त्या सगळ्यांचे वेदीवर होम करावे. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे. याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

  6. नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्‍ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.

  7. त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.

  8. मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना ते लावावे व राहिलेले रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.

  9. वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा; तो कधीही विझू देऊ नये.

  10. मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन, निवासमंडप व त्यातील जे सर्वकाही होते, त्यांना अभिषेक करून ती पवित्र केली.

  11. काही तेल त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले; वेदी आणि त्यावरील सर्व उपकरणे, हात धुण्याचे भांडे व त्याची बैठक पवित्र करण्यासाठी त्याने ते तेल त्यांच्यावरही शिंपडले.

  12. मग मोशेने त्या गोर्‍ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्‍ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली.

  13. याहवेहपासून अग्नी येऊन त्याने वेदीवरील होमार्पण व चरबीही भस्म केली. जेव्हा लोकांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने जयजयकार केला आणि जमिनीवर लोटांगण घातले.

  14. याहवेहला आंधळा, हाड तुटलेला, लुळा किंवा अंगावर मस, इसब अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी अर्पण करू नका. यापैकी काहीही वेदीवर याहवेहला हवन म्हणून अर्पण ठेऊ नका.

  15. जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.

  16. मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली.

  17. त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.

  18. याहवेहने मोशेला म्हटले,

  19. “तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.”

  20. तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.

  21. गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले.

  22. आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.

  23. कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते.

  24. जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.

  25. कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”