Pharez
हे नावानेही ओळखले जाते: Phares, Perez
Pharez चा उल्लेख असलेली वचने
परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस ठेवले.
यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.
यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.
पेरेसचे वंशज हे होते: हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; हामूलपासून हामूली कूळ.
या तरुण स्त्रीपासून याहवेह तुला संतती देवो, तुझे कुटुंब तामार आणि यहूदाहचा पुत्र पेरेससारखे होवो.”
पेरेसाची वंशावळ अशी: पेरेस हा हेस्रोनचा पिता होता,
यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले;
पेरेसाचे पुत्र: हेस्रोन व हामूल.
यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.
ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता.
तो पेरेसाच्या वंशातील होता आणि त्याच्या नेतृत्वाची सैन्य तुकडी पहिल्या महिन्यात कामावर असे.
पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र, तो अमर्याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;
पेरेसाचे जे वंशज यरुशलेममध्ये राहत होते ते सर्व 468 वीरपुरुष होते.
यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता,
तो अम्मीनादाबाचा, हा अम्मीनादाब रामाचा पुत्र, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाहचा,