मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Judah बद्दल बायबलमधील वचने

84 वचने · 42 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहूदीयाच्या सर्व लोकांनी इस्राएली लोकांना उत्तर दिले, “आम्ही असे केले, कारण राजा आमचा जवळचा नातेवाईक आहे. तुम्हाला त्याविषयी का राग यावा? राजाच्या सामुग्रीतील आम्ही काही खाल्ले आहे काय? आमच्यासाठी आम्ही काही घेतले आहे काय?”

  2. दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह यांना आत बोलवा.” जेव्हा ते राजापुढे आले,

  3. राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा.

  4. तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. कर्णे वाजवून घोषणा करावी, ‘शलोमोन राजा चिरायू होवोत!’

  5. नंतर तुम्ही त्याच्यासोबत वर जावे आणि त्याने येऊन माझ्या राजासनावर बसून माझ्या जागेवर राज्य करावे. मी त्याला इस्राएलचा आणि यहूदीयाचा राज्यकर्ता नेमले आहे.”

  6. यहोयादाचा पुत्र बेनाइयाहने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत.

  7. याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.”

  8. तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले.

  9. सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेलाचे शिंग घेतले आणि शलोमोनचा अभिषेक केला. नंतर त्यांनी कर्णे वाजविले आणि “शलोमोन राजा चिरायू असो! असा सर्व लोकांनी जयघोष केला.”

  10. यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता,

  11. अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता,

  12. सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता,

  13. इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती,

  14. शलोमोन रहबामाचा पिता, रहबाम अबीयाचा पिता, अबीया आसाचा पिता,

  15. आसा यहोशाफाटाचा पिता, यहोशाफाट योरामाचा पिता, योराम उज्जीयाहचा पिता,

  16. उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता,

  17. हिज्कीयाह मनश्शेहचा पिता, मनश्शेह आमोनाचा पिता, आमोन योशीयाहचा,

  18. योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.

  19. बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर: यखन्या शल्तीएलचा पिता, शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता,

  20. जरूब्बाबेल अबीहूदचा पिता, अबीहूद एल्याकीमचा पिता, एल्याकीम अज्जूरचा पिता,

  21. अज्जूर सादोकाचा पिता, सादोक याखीमचा पिता, याखीम एलीहूदाचा पिता,

  22. एलीहूद एलअज़ाराचा पिता, एलअज़ार मत्तानाचा पिता, मत्तान याकोबाचा पिता,

  23. याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती.

  24. येशूंनी आपले कार्य सुरू केले, त्यावेळी ते सुमारे तीस वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव योसेफ आहे, असे लोक समजत असत. योसेफ हा एलीचा पुत्र होता.

  25. एली हा मत्ताथाचा पुत्र, तो लेवीचा पुत्र, तो मल्खीचा पुत्र, तो यन्नयाचा पुत्र, तो योसेफाचा पुत्र,