मुख्य मजकुरावर जा

Naaman

11 वचने

Naaman चा उल्लेख असलेली वचने

  1. नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.

  2. आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली.

  3. त्याने इस्राएलाच्या राजासाठी जे पत्र नेले, त्यामध्ये असे लिहिले होते: “या पत्रासोबत मी माझा सेवक नामानला तुमच्याकडे पाठवित आहे, तुम्ही त्याचे कुष्ठरोग बरे करावे.”

  4. तेव्हा नामानाने आपले घोडे आणि रथ घेतले आणि अलीशाच्या दारात येऊन उभा राहिला.

  5. परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.

  6. नामान म्हणाला, “तुम्हाला नजराणे नको असतील तर घेऊ नका, पण निदान माझ्यावर थोडी कृपा करा आणि बरोबर नेण्यासाठी मला दोन खेचरांवर लादून नेता येईल एवढी येथील माती तरी द्या, कारण येथून पुढे याहवेहशिवाय मी इतर कोणत्याही दैवताला कधीही होमार्पण किंवा यज्ञार्पण करणार नाही.

  7. इकडे परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजी स्वतःस म्हणाला, “माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून नजराणे न स्वीकारता त्याला असेच जाऊ दिले. जिवंत याहवेहची शपथ, आता मी स्वतः त्याच्यामागे पळत जाईन आणि त्याच्यापासून काहीतरी घेईन.”

  8. गेहजी नामानाच्या मागे धावला. नामानाने जेव्हा त्याला त्याच्याकडे धावत येताना पाहिले, तो आपल्या रथातून खाली उतरून त्यास भेटण्यास गेला. नामानाने विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”

  9. नामान म्हणाला, “तू आनंदाने दोन तालांत घेऊन जा.” त्याने ते स्वीकारण्याची त्याला विनंती केली आणि मग ती चांदी आणि पोशाखांच्या दोन थैल्या बांधून दिल्या. त्याने ते आपल्या दोन सेवकांना दिले आणि ते त्याच्यापुढे निघाले.

  10. तुला व तुझ्या संतानाला नामानाचा कुष्ठरोग निरंतर लागून राहील.” तेव्हा गेहजी अलीशाच्या सान्निध्यातून निघून गेला आणि त्याच्या त्वचेवर कोड फुटले होते—आणि त्याची त्वचा हिमासारखी पांढरी झाली होती.

  11. आणि त्याचप्रमाणे संदेष्टा अलीशाच्या काळात इस्राएलमध्ये अनेक कुष्ठरोगी होते पण त्यांच्यापैकी कोणी शुद्ध झाला नाही—केवळ सिरिया देशातील नामान.”