Michal
Michal चा उल्लेख असलेली वचने
शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते.
या दरम्यान शौलाची कन्या मीखल हिचे दावीदावर प्रेम जडले, हे ऐकून शौलाला आनंद झाला.
दावीदाने आपली माणसे आपल्याबरोबर घेतली व जाऊन दोनशे पलिष्ट्यांना मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणल्या, दावीद राजाचा जावई व्हावा म्हणून त्यांनी त्या मोजल्या. मग शौलाने आपली कन्या मीखल दावीदाला त्याची पत्नी म्हणून दिली.
जेव्हा शौलाला लक्षात आले की याहवेह दावीदाबरोबर होते आणि त्याची कन्या मीखल हिची दावीदावर प्रीती होती,
शौलाने दावीदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारावे म्हणून माणसे पाठवली. परंतु दावीदाची पत्नी मीखल हिने त्याला सावध केले, “जर आज रात्री तू आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला नाही तर उद्या सकाळी तू मारला जाशील.”
तेव्हा मीखलने दावीदाला खिडकीतून खाली उतरविले आणि तो पळून गेला.
मीखलने एक मूर्ती घेऊन ती पलंगावर ठेवली, उशाकडे शेळीचे केस लावून ते एका वस्त्राने झाकले.
शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसविलेस आणि त्याने पळून जावे म्हणून तू माझ्या शत्रूला का जाऊ दिलेस?” मीखल त्याला म्हणाली, “मला तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, मी तुला का मारावे?’ ”
परंतु शौलाने त्याची कन्या मीखल, जी दावीदाची पत्नी होती तिला लईशाचा पुत्र पालती याला दिले होते, जो गल्लीम येथील होता.
दावीद म्हणाला, “ठीक आहे, मी तुझ्याबरोबर एक करार करेन. परंतु मी तुझ्याकडून एका गोष्टीची मागणी करतो: जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा शौलाची कन्या मीखल हिला घेऊन आल्याशिवाय माझ्यासमोर येऊ नकोस.”
नंतर दावीदाने शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “माझी पत्नी मीखल मला दे, जिला मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा किंमत देऊन वाग्दत्त करून घेतली.”
याहवेहचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर उड्या मारत आणि नाचत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.
दावीद जेव्हा आपल्या घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला, तेव्हा शौलाची मुलगी मीखल त्याला भेटण्यास बाहेर आली आणि म्हणाली, “आज इस्राएलाच्या राजाने एखाद्या असभ्य माणसाप्रमाणे आपल्या चाकरांच्या कन्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरून स्वतःस किती प्रतिष्ठित केले आहे!”
दावीद मीखलला म्हणाला, “ते याहवेहच्या समोर झाले, ज्यांनी तुझ्या पित्याच्या किंवा त्याच्या घराण्यातील इतर कोणाच्या ऐवजी माझी निवड करून याहवेहच्या इस्राएली लोकांवर मला राज्यकर्ता म्हणून नेमले; तर मी याहवेहसमोर आनंद साजरा करेन.
आणि शौलाची मुलगी मीखल हिला तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत संतती झाली नाही.
याहवेहच्या कराराचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर नाचत आणि हर्ष करीत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.