मुख्य मजकुरावर जा

Dancing बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 3 पैलू

"Dancing" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. आणि मग ते म्हणाले, पाहा, शिलोह येथे याहवेहचा उत्सव दरवर्षी असतो, तो बेथेलाच्या उत्तरेस आहे, जो रस्ता बेथेलापासून वर शेखेमास जातो त्याच्या पूर्वेकडे आणि लबोनाहच्या दक्षिणेस आहे.”

  2. म्हणून त्यांनी बिन्यामीन लोकांना अशी सूचना दिली, “जा आणि द्राक्षमळ्यात लपून बसा

  3. आणि लक्ष ठेवा. तुम्ही तिथे जा आणि शिलोहतील कन्या त्यांचे नृत्य करण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यातून धावत बाहेर निघा आणि तुम्ही प्रत्येकाने एकएका तरुणीला धरून आपली पत्नी करून घ्यावी. नंतर बिन्यामीनच्या भूमीत परत यावे.

  4. तागाचे एफोद परिधान करून दावीद त्याच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर नाचत होता,

  5. दावीद आणि सर्व इस्राएली लोक आनंदाचा जयघोष करीत आणि रणशिंगांचा नाद करीत याहवेहचा कोश आणत होते.

  6. याहवेहचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर उड्या मारत आणि नाचत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.

  7. खास पोसलेले एक वासरू कापा. हा आनंदाचा प्रसंग आपण मेजवानीने साजरा करू.

  8. कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, आता तो जिवंत झाला आहे, हरवला होता, आणि आता तो सापडला आहे.’ त्यांनी अशा रीतीने आनंद केला.

  9. “तेवढ्यात थोरला मुलगा शेतातील आपले काम आटोपून घरी आला आणि त्याला घरातून येणारे नृत्यसंगीत ऐकू आले.