Skip to content

Zion बद्दल बायबलमधील वचने

70 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजा आणि त्यांची माणसे यरुशलेममध्ये राहत असलेल्या यबूसी लोकांवर हल्ला करण्यासाठी निघाले. यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही; येथील आंधळे आणि लंगडेही तुम्हाला बाहेर हाकलून लावतील.” त्यांना वाटले, “दावीद येथे आत येऊ शकणार नाही.”

  2. तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.

  3. त्या दिवशी दावीदाने म्हटले होते, “जो कोणी यबूसी लोकांवर विजय मिळवील त्याने पाण्याच्या झोताकडून जाऊन ‘आंधळे व लंगडे’ अशा दावीदाच्या शत्रूंवर हल्ला करावा म्हणूनच असे म्हटले जाते, ‘आंधळे आणि लंगडे’ राजवाड्यात प्रवेश करणार नाहीत.”

  4. दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला आणि त्याला दावीदाचे शहर असे म्हटले. त्याने बुरुजापासून आतील भागापर्यंत तट बांधले.

  5. दावीद राजाला असे सांगण्यात आले की, “याहवेहने ओबेद-एदोमच्या घराण्यास व त्याचे जे काही आहे त्यास, परमेश्वराच्या कोशामुळे आशीर्वादित केले आहे,” तेव्हा परमेश्वराचा कोश ओबेद-एदोमच्या घरापासून दावीदाच्या नगरात आणावा म्हणून दावीद आनंद करीत गेला.

  6. याहवेहचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर उड्या मारत आणि नाचत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.

  7. तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले.

  8. त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे: “सीयोनाची कुमारी कन्या तुझा उपहास आणि तिरस्कार करते. यरुशलेम कन्या तुझे पलायन बघून आपले डोके हालविते.

  9. यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने हे सर्व घडून येईल.

  10. तिथे राहणारे यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही.” तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.

  11. दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसींवर हल्ला करण्यात पुढाकार घेईल तो सेनापती होईल.” मग जेरुइयाहचा पुत्र योआबने पहिल्याने आक्रमण करण्यास गेल्यामुळे तो दावीदाच्या सैन्याचा सेनापती झाला.

  12. तेव्हा दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला, म्हणून त्याला दावीदाचे शहर असे नाव पडले.

  13. आता दावीदाने स्वतःसाठी दावीद नगर यरुशलेममध्ये भवने बांधली व त्याने परमेश्वराच्या कोशाकरिता एक स्थान सिद्ध करून तिथे एक नवा तंबू ठोकला.

  14. याहवेहच्या कराराचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर नाचत आणि हर्ष करीत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.

  15. मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती.

  16. तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले.

  17. सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर करा.

  18. त्यांचे शिखर मनोहर आहेत, ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे, सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन पर्वतासारखेच उंच आहे, जे राजाधिराजाची नगरी आहे.

  19. तुमच्या न्यायकृत्यांमुळे सीयोन पर्वत आनंद करो; यहूदाहची नगरे हर्ष करोत.

  20. सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा, तिचे बुरूज मोजा.

  21. जे राष्ट्र प्राचीन काळी मोलाने विकत घेतले, ज्यांना आपले वारस होण्याकरिता तुम्ही खंडणी भरून सोडविले— सीयोन पर्वत जे तुमचे वसतिस्थान, त्यांचे स्मरण करा.

  22. याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.

  23. परमेश्वराच्या नगरी, तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: सेला

  24. खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल, “हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे, आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.”

  25. कारण याहवेहनी सीयोनाची निवड केलेली आहे, आपल्या निवासस्थानासाठी त्यांची ही अभिलाषा आहे, ते म्हणतात,