Skip to content

Zion बद्दल बायबलमधील वचने

70 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सीयोनात कर्णा वाजवा! पवित्र उपास घोषित करा पवित्र सभा बोलवा.

  2. पण सीयोन पर्वतावर तारण होईल; ते पवित्र होईल, आणि याकोबास त्याचे वतन मिळेल.

  3. सुटका करणारे एसाव पर्वतावर राज्य करण्यासाठी सीयोन पर्वतावर चढतील. आणि ते याहवेहचे राज्य असेल.

  4. हे सीयोनकन्ये, तू गीत गा; हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर! अगे यरुशलेमकन्ये, अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर.

  5. त्या दिवशी ते यरुशलेमला असे म्हणतील, “हे सीयोना, भिऊ नकोस, तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस.

  6. मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे,

  7. “आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ”

  8. “चल सीयोने! जी तू बाबेल कन्येत राहते!”

  9. “अगे सीयोनकन्ये, गीत गा आणि उल्हास कर! कारण मी येत आहे आणि मी तुम्हामध्ये वस्ती करेन,” याहवेह जाहीर करतात.

  10. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “सीयोनेबाबत मला अत्यंत ईर्षा वाटते; मी तिच्याबद्दल ईर्षेने ज्वलंत झालो आहे.”

  11. याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.”

  12. सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!

  13. यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन. अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन, आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन.

  14. “सीयोनकन्येला सांगा की, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.”

  15. “सीयोनकन्ये भिऊ नको; पाहा, तुझा राजा येत आहे गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.”

  16. असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  17. आणि याप्रकारे सर्व इस्राएलचे तारण होईल. याविषयी लिहिले आहे: “सीयोनातून तारणारा येईल; व तो याकोबाला सर्व अभक्तीपासून वळवेल.

  18. परंतु तुम्ही सीयोन पर्वतावर, जिवंत परमेश्वराच्या शहरात, स्वर्गीय यरुशलेमात आणि असंख्य देवदूतांच्या आनंदी संमेलनात आला आहात.

  19. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  20. नंतर सीयोन पर्वतावर एक कोकरा उभा असलेला मी पाहिला. ज्यांच्या कपाळावर त्यांचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे 1,44,000 लोक त्याच्याबरोबर होते.