मुख्य मजकुरावर जा

Zion बद्दल बायबलमधील वचने: Restoration of, promised

21 वचने · 9 पैलू

Restoration of, promised बद्दल वचने

  1. तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.

  2. ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.

  3. मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे— मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले, आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला, आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ”

  4. ऊठ, ऊठ, हे सीयोना, सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर! यरुशलेम, हे पवित्र नगरी, आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर. बेसुंती आणि भ्रष्ट यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत.

  5. हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक, ऊठ व सिंहासनारुढ हो. बंदिवान सीयोनकन्ये, दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो.

  6. पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”

  7. ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात; एकत्र मिळून ते आनंदाचा जयघोष करतात. जेव्हा याहवेह सीयोनास परत येतील, ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहतील.

  8. “याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे, सीयोनात त्यांचा उद्धारक येईल,” अशी याहवेह घोषणा करतात.

  9. तुमच्यावर अत्याचार करणार्‍यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील; जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील. ते तुला याहवेहचे शहर, आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील.

  10. पण सीयोन पर्वतावर तारण होईल; ते पवित्र होईल, आणि याकोबास त्याचे वतन मिळेल.

  11. सुटका करणारे एसाव पर्वतावर राज्य करण्यासाठी सीयोन पर्वतावर चढतील. आणि ते याहवेहचे राज्य असेल.

  12. हे सीयोनकन्ये, तू गीत गा; हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर! अगे यरुशलेमकन्ये, अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर.

  13. त्या दिवशी ते यरुशलेमला असे म्हणतील, “हे सीयोना, भिऊ नकोस, तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस.

  14. मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे,

  15. “आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ”

  16. “चल सीयोने! जी तू बाबेल कन्येत राहते!”

  17. “अगे सीयोनकन्ये, गीत गा आणि उल्हास कर! कारण मी येत आहे आणि मी तुम्हामध्ये वस्ती करेन,” याहवेह जाहीर करतात.

  18. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “सीयोनेबाबत मला अत्यंत ईर्षा वाटते; मी तिच्याबद्दल ईर्षेने ज्वलंत झालो आहे.”

  19. याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.”

  20. सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!

  21. यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन. अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन, आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन.