Skip to content

Eden

10 verses

Eden चा उल्लेख असलेली वचने

  1. माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय?

  2. माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय?

  3. तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.

  4. “ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्‍यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला.

  5. तू एदेन बागेत, परमेश्वराच्या बागेत होतास; प्रत्येक मौल्यवान पाषाण म्हणजेच अलाक, पुष्कराज आणि हिरा, लसणा, गोमेद, यास्फे आणि नीलमणी, पाचू, माणिक व रत्ने अशांनी तू सजला होता. तुझ्या बैठकी व पाटे सोन्याच्या घडल्या होत्या; तू जन्मला त्याच दिवशी ते तयार केले होते.

  6. पुष्कळ फांद्यांनी मी त्याला सुंदर बनविले, परमेश्वराच्या बागेतील, एदेन बागेतील झाडे त्याचा हेवा करीत असत.

  7. गर्तेत जाणार्‍यांबरोबर त्याला मी अधोलोकात आणले, त्यात तो पडला तेव्हा त्याच्या आवाजाने राष्ट्रे थरथर कापले. तेव्हा एदेनातील सर्व झाडे, लबानोनातील सर्वोत्तम, पाण्याचा पुष्कळ पुरवठा असलेली झाडे, पृथ्वीच्या खाली सांत्वन पावले.

  8. “ ‘वैभव व ऐश्वर्यासंबंधात यापैकी एदेनातील कोणत्या झाडाची तुलना होऊ शकते? तरीही, तू सुद्धा एदेनातील झाडांबरोबर खाली पृथ्वीवर आणला जाशील; बेसुंती लोक, जे तलवारीने मारले गेले त्यांच्याबरोबर तू पडून राहशील. “ ‘हे फारोह व त्याच्या सैन्याबरोबर घडेल असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  9. ते म्हणतील, “ही भूमी जी ओसाड पडली होती ती एदेन बागेसारखी झाली आहे; शहरे जी उद्ध्वस्त, उजाड व ओसाड पडली होती, ती आता तटबंदीची होऊन त्यात वस्ती झाली आहे.”

  10. त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे, त्यांच्यामागे ज्वाला पेटली आहे. त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड वाळवंट आहे— त्यांच्या तावडीतून काहीच वाचू शकत नाही.