Consolation Under Affliction बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे, आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत. तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात, ‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.
मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील;
आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही, आपल्या देहाशिवाय मी परमेश्वराला पाहीन;
परंतु परमेश्वरा, तुम्ही पीडितांच्या यातना पाहता; तुम्ही त्यांची संकटे लक्षात घेऊन आपल्या नियंत्रणात घ्या. ते पीडित स्वतःला तुमच्या स्वाधीन करीत आहेत; कारण तुम्ही पितृहीनांचे साहाय्यकर्ता आहात.
मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.
माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला. तरी याहवेह, माझा स्वीकार कराल.
या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला; त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले.
याहवेहची पवित्र प्रजा, त्यांचे भय बाळगा, कारण जे त्यांचे भय बाळगतात, त्यांना काही उणे पडत नाही.
तरुण सिंहदेखील दुर्बल होतील व उपाशी राहतील, परंतु याहवेहचा शोध घेणार्यांना कोणत्याही उत्तम गोष्टीची उणीव पडणार नाही.
ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात; ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात.
प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.
परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा; म्हणजे मला त्यांचा सूड घेता येईल.
तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात, म्हणून माझे शत्रू माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही.
तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा आणि सदैव तुमच्या समक्षतेत ठेवा.
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.
भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे, हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय तुम्ही धिक्कारणार नाही.
त्यांच्याकडून होणार्या तिरस्काराने माझे हृदय भग्न झाले आहे; मी अत्यंत हतबल झालो आहे; मी सहानुभूतीची अपेक्षा केली, पण ती मला मिळाली नाही; मी सांत्वना देणार्यांचा शोध घेतला पण मला कोणीही आढळले नाही.
माझ्या वृद्धावस्थेत माझा त्याग करू नका; माझी शक्ती म्लान होत असता मला सोडू नका.
आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना, परमेश्वरा, माझा त्याग करू नका; तुमच्या सर्व सामर्थ्याचे वर्णन नवीन पिढीला आणि त्यांच्या मुलांना देखील सांगण्यासाठी तुम्ही मला अवधी द्या.
तुम्ही माझा सन्मान वाढवाल आणि माझ्याकडे वळून पुनः माझे सांत्वन कराल.
जेव्हा माझे अंतःकरण व्याकूळ झाले, तेव्हा तुमच्या सांत्वनाने मला हर्षित केले.
माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.
तुमच्या अभिवचनानुसार तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो;
तुमच्या अभिवचनपूर्तीची वाट पाहून माझे डोळे शिणले आहेत; मी म्हणतो, “तुम्ही माझे सांत्वन केव्हा करणार?”
मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: पीडितांचे अश्रू मी पाहिले— आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. छळ करणार्यांच्या हाती अधिकार होते— आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.