Titus
Titus चा उल्लेख असलेली वचने
परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.
मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.
या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले. परंतु याहून अधिक आनंद आम्हाला मिळाला तो तीताच्या आनंदाने! कारण तुम्ही त्याच्या आत्म्याला ताजेतवाने केले.
मला तुमच्याबद्दल केवढा अभिमान आहे, हे मी त्याला सांगितले होते आणि तुम्ही मला मुळीच निराश केले नाही. जे काही आम्ही तुम्हाला सांगितले ते सर्व खरे होते, तसेच मी तीतापुढे काढलेले तुमच्याबद्दलचे अभिमानाचे शब्दही खरे ठरले आहेत!
म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे.
जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.
तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत.
तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?
नंतर चौदा वर्षानंतर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो, यावेळेस बर्णबास माझ्याबरोबर होता. मी तीतालाही आमच्याबरोबर घेतले.
माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही.
कारण देमासाने जगावर प्रीती केल्याने, मला सोडून तो थेस्सलनीकास गेला आहे. क्रिसेन्स गलातीयास व तीत दालमतियास गेले आहेत.
आमच्यासारखाच विश्वासात असलेला माझा खरा पुत्र तीत याला: