Afflicted Saints बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाच्या कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवीत, तिथे त्याने योसेफाला ठेवले, परंतु जेव्हा योसेफ तुरुंगात होता,
याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले.
तुरुंगाच्या अधिकार्याने तुरुंगाचा सर्व कारभार योसेफाच्या हाती दिला आणि सर्व कैदीही योसेफाच्या ताब्यात दिले.
त्यानंतर तुरुंगाच्या अधिकार्याला कसलीच काळजी उरली नाही, कारण याहवेह योसेफाबरोबर होते आणि तो जे काही करत असे त्यामध्ये ते त्याला यश देत.
तेव्हा शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवले नाही. तेव्हा एली म्हणाला, “ते याहवेह आहेत; त्यांच्या दृष्टीने जे बरे ते करो.”
नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला.
दावीदाने मुलासाठी परमेश्वराकडे याचना केली. त्याने उपास केला व गोणपाट घालून रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
त्याच्या घरातील वडील लोक त्याला जमिनीवरून उठविण्यासाठी त्याच्या बाजूला उभे राहिले, परंतु त्याने नकार दिला आणि त्याने त्यांच्याबरोबर काहीही अन्न खाल्ले नाही.
सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.”
आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?” “होय, तो मरण पावला आहे.” त्यांनी उत्तर दिले.
तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले.
त्याच्या सेवकांनी त्याला विचारले, “तुम्ही हे असे का वागत आहात? मूल जेव्हा जिवंत होते, तेव्हा तुम्ही उपास केला आणि रडलात, परंतु आता मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही उठून भोजन करीत आहात.”
त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’
परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.”
हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभरात शांती आणि सुरक्षितता नसणार काय?”
हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो.
जे सर्वकाही आमच्याबाबत घडले, त्यात तुमची विश्वासार्हता कायम होती; तुमची वागणूक विश्वासयोग्य होती, पण आम्ही मात्र दुष्टपणे वागलो.
हे ऐकताच इय्योब उठला आणि त्याने आपला झगा फाडला आणि डोक्यावरून वस्तरा फिरविला. नंतर जमिनीवर पडून त्याने उपासना केली
आणि म्हणाला: “आईच्या उदरातून मी नग्न आलो, आणि नग्नच मी परत जाईन, याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले; त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”
या सर्व बाबतीत, इय्योबाने पाप केले नाही किंवा परमेश्वराने अयोग्य केले असा दोष त्यांच्यावर लावला नाही.
यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.
“परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.
जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन; व खचितच त्यांच्यासमोर मी माझ्या मार्गाचे समर्थन करेन.
“समजा कोणी परमेश्वराला म्हटले, ‘मी पापी आहे, परंतु मी यापुढे पाप करणार नाही.
मी पाहू शकत नाही ते मला शिकवा; मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’