मुख्य मजकुरावर जा

Afflicted Saints बद्दल बायबलमधील वचने: God is a refuge and strength to

5 वचने · 31 पैलू

God is a refuge and strength to बद्दल वचने

  1. कारण संकटाच्या दिवसात ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील; तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील; उंच खडकावर मला सुरक्षा देतील.

  2. माझ्या सभोवती असणार्‍या शत्रूंसमोर माझे मस्तक उंच करतील. मी त्यांच्या पवित्र मंडपात हर्षगर्जना करून यज्ञ अर्पण करेन; मी गायन व संगीताने माझ्या याहवेहची स्तुती करेन.

  3. तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,

  4. याहवेह, माझे सामर्थ्य व माझे दुर्ग, संकटकाळच्या वेळी माझा आश्रय, जगातील सर्व राष्ट्रे अगदी शेवटापासून तुमच्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांकडे खोट्या दैवतांशिवाय काहीही नव्हते, व्यर्थ मूर्ती, ज्या त्यांचे काही भले करू शकल्या नाही.

  5. याहवेह चांगले आहेत, संकटसमयी आश्रयस्थान आहेत. त्यांच्यावर भरवसा ठेवणार्‍या प्रत्येकाची ते काळजी घेतात.