मुख्य मजकुरावर जा

Afflicted Saints बद्दल बायबलमधील वचने: Should praise God

11 वचने · 31 पैलू

Should praise God बद्दल वचने

  1. कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.

  2. मी याहवेहची स्तुती गाईन, कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.

  3. तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत; तुम्ही माझे अश्रू तुमच्या कुपीमध्ये ठेवले आहेत; तुमच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत त्यांची नोंद नाही काय?

  4. ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन. माझे शत्रू मागे फिरून पळ काढतील; त्यावरून हे प्रमाणित होणार की परमेश्वर माझ्या पक्षाचे आहेत.

  5. परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन, याहवेहमध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन—

  6. माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे— संकटात मी वाकून गेलो होतो. माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता— परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत. सेला

  7. हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.

  8. असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या तुम्ही मला दाखविल्या आहेत, तरी तुम्ही मला नवजीवन द्याल, आणि पृथ्वीच्या गर्भातून तुम्ही मला पुन्हा वर काढाल.

  9. तुम्ही माझा सन्मान वाढवाल आणि माझ्याकडे वळून पुनः माझे सांत्वन कराल.

  10. माझ्या परमेश्वरा, मी सतारीवर तुमच्या विश्वासूपणाबद्दल तुमचे स्तवन करेन; हे इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरा, मी वीणेवर तुमची स्तुती गाईन.

  11. हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील आणि तुम्ही माझा उद्धार केला म्हणून मी तुमची स्तुतिस्तोत्रे उच्चस्वराने गाईन.