Consolation Under Affliction बद्दल बायबलमधील वचने: By ministers of the gospel
By ministers of the gospel बद्दल वचने
सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, तुमचे परमेश्वर असे म्हणतात.
यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला, आणि तिला असे घोषित करा की, तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे, तिच्या पापाची परतफेड झाली आहे, याहवेहच्या हातातून तिला तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.
परंतु जो कोणी संदेश देतो तो लोकांची आत्मिक वृद्धी, प्रोत्साहन, आणि समाधान व्हावे म्हणून बोलतो.
ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे.
जर आम्ही दुःखी आहोत तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी; जर आम्हाला सांत्वन लाभले आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी, यासाठी की जी दुःखे आम्ही सोसतो व जी तुम्हीही सोसत आहात, त्यामुळे तुम्हामध्ये धीर व सहनशीलता उत्पन्न व्हावी