Pharaoh
हे नावानेही ओळखले जाते: Pharaoh-hophra
Pharaoh चा उल्लेख असलेली वचने
याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्यांच्या हातात देईन.’ ”
पुष्कळ जिवांचा नाश करण्यासाठी जेव्हा मोर्चे बांधतील व बुरूज उभारतील, तेव्हा फारोह त्याच्या बलवान सैन्य व मोठ्या जमावाच्या मदतीने त्या युद्धात त्याचे साहाय्य करू शकणार नाही.
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहकडे आपले तोंड कर आणि त्याच्या व सर्व इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी कर.
त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे इजिप्तच्या फारोह राजा मी तुझ्याविरुद्ध आहे, तू तो प्रचंड मोठा श्वापद आहेस जो पाण्याच्या प्रवाहात पडून असतो. तू म्हणतोस, “नाईल नदी माझी आहे; तिला मी माझ्यासाठी बनविले आहे.”
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह याचा हात मी मोडला आहे. तो बरा व्हावा म्हणून त्याला पट्टी बांधली नाही किंवा तलवार धरता येईल इतकी शक्ती मिळावी म्हणून दोरीतही ठेवला नाही.
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात, मी इजिप्तचा राजा फारोह याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे हात म्हणजे जो अभंग आहे व जो मोडलेला आहे असे दोन्ही हात मोडेन, म्हणजे त्याच्या हातून तलवार गळून पडेल.
मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन, परंतु फारोहचे हात लुळे पडतील. जेव्हा मी बाबेलच्या राजाच्या हाती माझी तलवार देईन आणि जेव्हा तो ती इजिप्तविरुद्ध चालवील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व लोकांना सांग: “ ‘वैभवाबाबतीत तुझ्याशी कोणाची तुलना होऊ शकते?
“ ‘वैभव व ऐश्वर्यासंबंधात यापैकी एदेनातील कोणत्या झाडाची तुलना होऊ शकते? तरीही, तू सुद्धा एदेनातील झाडांबरोबर खाली पृथ्वीवर आणला जाशील; बेसुंती लोक, जे तलवारीने मारले गेले त्यांच्याबरोबर तू पडून राहशील. “ ‘हे फारोह व त्याच्या सैन्याबरोबर घडेल असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहसाठी विलाप कर आणि त्याला सांग: “ ‘राष्ट्रांमध्ये तू सिंहासारखा आहेस; तू समुद्रातील श्वापदासारखा आहेस, तुझ्या झर्यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी घुसळले आणि झर्यात चिखल केलास.
“फारोह व त्याचे सर्व सैन्य त्यांना पाहतील आणि तलवारीने वधलेल्या त्याच्या सर्व सैन्यांसाठी तो सांत्वन पावेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
जरी जिवंताच्या भूमीवर फारोहचे भय मी पसरविले होते, तरीही फारोह व त्याचे सर्व सैन्य जे लोक तलवारीने वधलेले, सुंता न झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”