मुख्य मजकुरावर जा

Zion बद्दल बायबलमधील वचने: Name of Zion applied to Jerusalem

9 वचने · 9 पैलू

Name of Zion applied to Jerusalem बद्दल वचने

  1. याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.

  2. खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल, “हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे, आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.”

  3. हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.

  4. अहो सीयोनच्या कन्यांनो, बाहेर या आणि पाहा, शलोमोन राजा कसा मुकुटमंडित आहे ते पाहा, त्याच्या विवाहाच्या दिवशी त्याच्या आईने त्याला तो घातला आहे, त्याचे हृदय आनंदित झाले तो हा दिवस.

  5. सीयोनमध्ये असलेले पापी जन घाबरले आहेत; देवहीन लोक थरथर कापत आहेत: “भस्म करणाऱ्या अग्नीमध्ये आमच्यामधील कोण राहू शकेल? सार्वकालिक अग्नीत आमच्यामधील कोण जळत राहू शकेल काय?”

  6. आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा; तुमची दृष्टी यरुशलेम पाहतील, शांत असलेले निवासस्थान, हालविल्या न जाणारा तंबू; त्याच्या खुंट्या कधीही उपटल्या जाणार नाहीत, किंवा त्याच्या कोणत्याही दोऱ्या तोडल्या जाणार नाहीत.

  7. सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! आमच्यावर घोर लज्जा आली आहे! आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ”

  8. मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्‍या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’

  9. यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन. अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन, आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन.