Skip to content

Zion बद्दल बायबलमधील वचने

70 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो.

  2. हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.

  3. अहो सीयोनच्या कन्यांनो, बाहेर या आणि पाहा, शलोमोन राजा कसा मुकुटमंडित आहे ते पाहा, त्याच्या विवाहाच्या दिवशी त्याच्या आईने त्याला तो घातला आहे, त्याचे हृदय आनंदित झाले तो हा दिवस.

  4. सीयोनमध्ये असलेले पापी जन घाबरले आहेत; देवहीन लोक थरथर कापत आहेत: “भस्म करणाऱ्या अग्नीमध्ये आमच्यामधील कोण राहू शकेल? सार्वकालिक अग्नीत आमच्यामधील कोण जळत राहू शकेल काय?”

  5. आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा; तुमची दृष्टी यरुशलेम पाहतील, शांत असलेले निवासस्थान, हालविल्या न जाणारा तंबू; त्याच्या खुंट्या कधीही उपटल्या जाणार नाहीत, किंवा त्याच्या कोणत्याही दोऱ्या तोडल्या जाणार नाहीत.

  6. आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.

  7. तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता, उंच डोंगरावर जा. यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही, तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या, आवाज उंच करा, घाबरू नका; यहूदीयाच्या नगरांना सांगा, “तुमचे परमेश्वर येत आहेत!”

  8. परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे; प्रभू आम्हाला विसरले आहेत.”

  9. तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.

  10. ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.

  11. मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे— मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले, आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला, आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ”

  12. ऊठ, ऊठ, हे सीयोना, सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर! यरुशलेम, हे पवित्र नगरी, आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर. बेसुंती आणि भ्रष्ट यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत.

  13. हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक, ऊठ व सिंहासनारुढ हो. बंदिवान सीयोनकन्ये, दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो.

  14. पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”

  15. ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात; एकत्र मिळून ते आनंदाचा जयघोष करतात. जेव्हा याहवेह सीयोनास परत येतील, ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहतील.

  16. “याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे, सीयोनात त्यांचा उद्धारक येईल,” अशी याहवेह घोषणा करतात.

  17. तुमच्यावर अत्याचार करणार्‍यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील; जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील. ते तुला याहवेहचे शहर, आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील.

  18. सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून, मी निःशब्द राहणार नाही, व यरुशलेमचे तारण जळत्या मशालीसारखे सिद्ध होईपर्यंत, मी शांत राहणार नाही.

  19. याहवेहनी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत घोषणा केली आहे: “सीयोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझे उद्धारकर्ता येत आहेत! पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याकडे आहे, आणि त्यांची भरपाई त्यांच्यासोबत आहे.’ ”

  20. सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! आमच्यावर घोर लज्जा आली आहे! आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ”

  21. मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्‍या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’

  22. ‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ, आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ” पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे,

  23. ते सीयोनकडे जाणार्‍या मार्गाची विचारणा करतील आणि त्या दिशेने ते अभिमुख होतील. ते येतील व याहवेहशी, कधीही विस्मृतित न जाणाऱ्या, एका सार्वकालिक कराराशी जडून जातील.

  24. सीयोनकडे जाणारे रस्ते विलाप करीत आहेत, निर्धारित सणाला तिच्याकडे कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत, तिचे याजक कण्हत आहेत, तिच्या तरुणी शोकग्रस्त आहेत, आणि तिला अत्यंत पीडा होत आहे.

  25. सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्‍या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—