Skip to content

Abinadab बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. म्हणून किर्याथ-यआरीमचे लोक आले आणि त्यांनी याहवेहचा कोश घेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी नेऊन ठेवला व कोशाचे राखण करण्यासाठी अबीनादाबाचा पुत्र एलअज़ार याला पवित्र केले.

  2. कोश किर्याथ-यआरीम येथे पुष्कळ काळ—म्हणजेच वीस वर्षे राहिला. तेव्हा सर्व इस्राएली लोक याहवेहकडे परत फिरले.

  3. शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते.

  4. नंतर इशायाने अबीनादाबाला शमुवेलसमोर चालविले. परंतु शमुवेलने म्हटले, “याहवेहने यालाही निवडले नाही.”

  5. इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते.

  6. पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा जोरात पाठलाग केला आणि त्यांनी त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले.

  7. त्यांनी परमेश्वराचा कोश एका नवीन गाडीत ठेवला व तो डोंगरावर असलेल्या अबीनादाबाच्या घरातून बाहेर आणला. अबीनादाबाचे पुत्र उज्जा आणि अहियो नवीन गाडी चालवित होते

  8. अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता.

  9. बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता);

  10. त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते.