Skip to content

Uzzah

8 वचने · 3 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Uzza

Uzzah चा उल्लेख असलेली वचने

  1. त्यांनी परमेश्वराचा कोश एका नवीन गाडीत ठेवला व तो डोंगरावर असलेल्या अबीनादाबाच्या घरातून बाहेर आणला. अबीनादाबाचे पुत्र उज्जा आणि अहियो नवीन गाडी चालवित होते

  2. जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.

  3. त्याच्या या आदरहीन कृत्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला; म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले आणि तो तिथे परमेश्वराच्या कोशाच्या बाजूला मरण पावला.

  4. तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.

  5. त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते.

  6. जेव्हा ते कीदोनाच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले म्हणून कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.

  7. त्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला आणि त्याने कोशाला हात लावला म्हणून त्यांनी त्याला मारून टाकले. आणि तो परमेश्वरापुढे मरण पावला.

  8. तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.