Skip to content

Merab

4 वचने · 10 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Michal

Merab चा उल्लेख असलेली वचने

  1. शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते.

  2. एके दिवशी शौल दावीदास म्हणाला, “माझी थोरली कन्या मेरब तुला मी पत्नी म्हणून देईन, केवळ शौर्याने माझी सेवा कर व याहवेहच्या लढाया लढ.” कारण शौल स्वतःशी म्हणाला, “मी दावीदावर हात टाकणार नाही, पलिष्ट्यांनी ते करावे.”

  3. तरीही जेव्हा शौलाची कन्या मेरबचा विवाह दावीदाशी होण्याची प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा तिचा विवाह महोलाथी अद्रीएल याच्याबरोबर झाला.

  4. परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लईचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले.