Skip to content

Ajah बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)

  2. रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर शरीरसंबंध का केला?”

  3. परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लईचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले.

  4. त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती.

  5. तेव्हा अय्याहची मुलगी रिजपाह हिने गोणपाट घेतले, आणि ते स्वतःसाठी खडकावर पसरविले. हंगामाच्या सुरुवातीपासून त्या शरीरावर आकाशातून पाऊस पडेपर्यंत, तिने दिवसा पक्ष्यांना आणि रात्री जंगली प्राण्यांना त्या शवांना स्पर्श करू दिला नाही.

  6. अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले,

  7. शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह.