Skip to content

Hadadezer बद्दल बायबलमधील वचने

38 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची पुनर्स्थापना करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजरचा पराभव केला.

  2. दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.

  3. जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना मारून टाकले.

  4. नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथे कुठे गेला, तिथे तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  5. हादादेजरच्या अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.

  6. हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ आणि बीरोथाई येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले.

  7. हमाथाचा राजा तोई याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,

  8. तेव्हा त्याने आपला पुत्र योरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोई यांच्यातही युद्ध होते. योरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या वस्तू आणल्या.

  9. दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही:

  10. अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.

  11. क्षार खोर्‍यातील अठरा हजार अरामी लोकांना मारून परत आल्यावर दावीदाचे नाव प्रसिद्ध झाले.

  12. नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा ते पुन्हा एकत्र झाले.

  13. हादादेजरने फरात नदीपलीकडून अरामी सैन्य आणले; हादादेजरच्या सैन्याचा सेनापती शोबाक याच्या नेतृत्वाखाली ते हेलाम येथे गेले.

  14. याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले, यार्देन नदी पार करून ते हेलामकडे गेले. अरामी सैन्याने दावीदाला भेटण्यासाठी त्यांच्या युद्धाच्या रांगा तयार केल्या आणि त्याच्याविरुद्ध युद्ध केले.

  15. परंतु अरामी इस्राएली समोरून पळून गेले आणि दावीदाने त्यांच्यातील सातशे रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोबाक याला सुद्धा मारले आणि तो तिथेच मरण पावला.

  16. जे सर्व राजे हादादेजरचे जहागीरदार होते, यांनी इस्राएलपुढे झालेला आपला पराभव पाहून, इस्राएलशी करार केला व त्यांच्या अधीन झाले. त्यानंतर पुढे अरामी लोक अम्मोनी लोकांना मदत करण्यास घाबरले.

  17. याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला.

  18. दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.

  19. जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले.

  20. नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  21. हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.

  22. हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले.

  23. हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,

  24. तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या.

  25. जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.