Skip to content

Hamath

23 verses

35.1300, 36.7400 गूगल नकाशावर पाहा

Hamath चा उल्लेख असलेली वचने

  1. हमाथाचा राजा तोई याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,

  2. यरोबोअमचे बाकीचे जीवनचरित्र, त्याने केलेली कृत्ये, त्याचे थोर सामर्थ्य, त्याचे युद्ध आणि त्याने पूर्वी यहूदीयाने काबीज केलेले दिमिष्क व हमाथ परत कसे मिळविले या सर्व हकिकतीचे वर्णन, इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवले नाही काय?

  3. मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले.

  4. बाबेलमधील लोकांनी सुक्कोथ-बनोथ मूर्ती केली. कूथमधील लोकांनी नेरगल केला व हमाथातील लोकांनी अशीमा केली;

  5. हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाहची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय?

  6. हमाथ नगरीचा राजा किंवा अर्पादचा राजा हे कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाह यांचे राजे कुठे आहेत?”

  7. त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.

  8. हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.

  9. हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,

  10. त्याने तदमोर शहरसुद्धा वाळवंटात बांधले आणि भांडारे असलेली सर्व नगरे त्याने हमाथ येथे बांधली.

  11. ‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?

  12. त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.

  13. हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईमची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय?

  14. हमाथ नगरीचा राजा किंवा अर्पादचा राजा हे कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाह यांचे राजे कुठे आहेत?”

  15. परंतु बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला व सिद्कीयाहला यरीहोच्या मैदानात पकडले व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याकडे हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.

  16. दिमिष्क विषयी: “हमाथ व अर्पाद ही शहरे भीतीने घाबरी झाली आहेत, कारण त्यांना वाईट बातमी समजली आहे. ते निराश झाले आहेत, एखाद्या खवळलेल्या समुद्रागत अस्वस्थ झाले आहेत.

  17. आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.

  18. हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.

  19. बेरोथाह व सिबराईमपासून (जी दिमिष्क व हमाथाच्या मध्ये आहे), हाजेर-हत्तीकोनपर्यंत, जे हवरानच्या सीमेवर आहे.

  20. ही सीमा समुद्रापासून हाजार-एनानपर्यंत वाढेल, जी दिमिष्कच्या उत्तरेच्या सीमेपर्यंत असेल व उत्तरेस हमाथची सीमा आहे. ही उत्तरेची सीमा आहे.

  21. “यादीत दिलेल्या गोत्रांची नावे ही: “उत्तरेकडील सीमेपासून दानला एक भाग असेल; तो हेथलोन मार्गापासून लेबो हमाथ, हाजार-एनानपर्यंत आणि हमाथ आणि हमाथनंतरची दिमिष्काची उत्तरेकडील सीमा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत.

  22. कालनेह येथे जा आणि तिला पाहा; तिथून महान हमाथास जा, आणि तिथून खाली पलिष्ट्यांच्या गथ येथे जा. हे तुमच्या दोन राज्याहून अधिक उत्तम आहेत काय? त्यांचा देश तुमच्या देशाहून मोठा आहे काय?

  23. सोर व सीदोनवर, आणि त्याच्या सीमेलगत असलेल्या हमाथवरही लागलेली आहे, जरी ते अत्यंत कुशल आहेत.