Skip to content

Jeroboam

14 वचने · 2 कुटुंब सदस्य

Jeroboam चा उल्लेख असलेली वचने

  1. योआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि यरोबोअम त्याच्या राजासनावर बसला. योआशाला शोमरोनात इस्राएलांच्या राजांसोबत मूठमाती देण्यात आली.

  2. यहोआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला इस्राएली राजांसोबत शोमरोनात मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र यरोबोअम हा त्याच्या जागी राज्य करू लागला.

  3. यहूदीयाचा राजा योआशाचा पुत्र अमस्याहच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा योआशचा पुत्र यरोबोअम शोमरोनात राज्य करू लागला आणि त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले.

  4. आणि इस्राएलचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकीन असे याहवेहने कधीच म्हटले नाही, मग याहवेहने योआशाचा पुत्र यरोबोअमद्वारे त्यांची सुटका केली.

  5. यरोबोअमचे बाकीचे जीवनचरित्र, त्याने केलेली कृत्ये, त्याचे थोर सामर्थ्य, त्याचे युद्ध आणि त्याने पूर्वी यहूदीयाने काबीज केलेले दिमिष्क व हमाथ परत कसे मिळविले या सर्व हकिकतीचे वर्णन, इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवले नाही काय?

  6. यरोबोअम त्याचे पूर्वज इस्राएली राजांना मिळाला. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र जखर्‍याह त्याच्या जागी इस्राएलावर राज्य करू लागला.

  7. इस्राएलाचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा अमस्याहाचा पुत्र अजर्‍याह राज्य करू लागला.

  8. यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्‍याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले.

  9. या सर्वांची वंशावळी यहूदीयाचा राजा योथाम व इस्राएलचा राजा यरोबोअम यांच्या कारकिर्दीत संग्रहित करण्यात आली होती.

  10. यहूदाहचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज, हिज्कीयाह आणि इस्राएलचा राजा, योआशचा पुत्र यरोबोअम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याच्याकडे याहवेहचे जे वचन आले ते हे:

  11. तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.

  12. “इसहाकाचे उच्च पूजास्थाने नाश करण्यात येतील आणि इस्राएलची पवित्रस्थाने पाडण्यात येतील; मी माझ्या तलवारीने यरोबोअमाच्या विरुद्ध उठेन.”

  13. तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत.

  14. कारण आमोस असे म्हणत आहे: “ ‘यरोबोअम हा तलवारीने मरणार आहे, आणि इस्राएल खात्रीने, आपल्या भूमीवरून दूर बंदिवासात जाईल.’ ”