Skip to content

Pharaohnechoh

7 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Necho, Pharaoh-nechoh

Pharaohnechoh चा उल्लेख असलेली वचने

  1. योशीयाह राजा असताना, इजिप्तचा राजा फारोह नखो हा अश्शूरच्या राजाला मदत करण्यासाठी फरात नदीजवळ गेला. योशीयाह राजा त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला, परंतु नखो राजाने त्याचा सामना केला आणि मगिद्दो येथे त्याला मारून टाकले.

  2. त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.

  3. फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला.

  4. यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले.

  5. या सर्व गोष्टीनंतर, जेव्हा योशीयाहने मंदिराची सेवा व्यवस्थित केल्यानंतर तेव्हा इजिप्तचा राजा नखो फरात नदीवर असलेल्या कर्कमीश येथे त्याच्याशी लढण्यास गेला आणि योशीयाह त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला.

  6. तरीसुद्धा, योशीयाह त्याच्यापासून मागे फिरला नाही, परंतु त्याला युद्धात गुंतवून ठेवण्यासाठी त्याने स्वतःचे वेषांतर केले. परमेश्वराच्या आज्ञेनुसार नखोने जे सांगितले, ते त्याने ऐकले नाही, परंतु तो मगिद्दोच्या मैदानावर त्याच्याबरोबर लढण्यासाठी गेला.

  7. इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदीया आणि यरुशलेमचा राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु नखोने एल्याकीमचा भाऊ यहोआहाजाला घेऊन इजिप्तमध्ये नेले.