Skip to content

Jehoiakim बद्दल बायबलमधील वचने

26 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला.

  2. यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले.

  3. वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती.

  4. त्याच्या पूर्वजांच्या प्रमाणे त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  5. यहोयाकीमच्या कारकिर्दीत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने देशावर स्वारी केली, आणि यहोयाकीम तीन वर्षे त्याचा ताबेदार राहिला. पण नंतर तो नबुखद्नेस्सरच्या विरोधात गेला आणि त्याने बंड पुकारले.

  6. याहवेहने यहूदाहचा नाश करण्यासाठी यहूदीयावर खास्द्यांच्या, अरामी, मोआबी व अम्मोनी यांच्या टोळ्या पाठविल्या, असे घडणार हे भविष्य याहवेहने आपल्या संदेष्ट्याद्वारे आधी केलेले होते.

  7. निश्चितच याहवेहच्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना आपल्या उपस्थितीतून घालून द्यावे म्हणून हे संकट यहूदीयावर आले, कारण मनश्शेहचे पाप आणि त्याने जे सर्व केले,

  8. त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले.

  9. यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने सर्व जे केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय?

  10. यहोयाकीम आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.

  11. इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदीया आणि यरुशलेमचा राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु नखोने एल्याकीमचा भाऊ यहोआहाजाला घेऊन इजिप्तमध्ये नेले.

  12. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  13. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बाबेलला घेऊन जाण्यासाठी त्याला कास्याच्या साखळदंडाने बांधले.

  14. नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील वस्तूसुद्धा बाबेलमध्ये नेल्या आणि त्या तिथे त्याच्या मंदिरात ठेवल्या.

  15. यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने केलेल्या घृणास्पद गोष्टी आणि त्याच्याविरुद्ध जे काही होते, ते सर्व इस्राएली आणि यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.

  16. “धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो, अन्यायाने माळे बांधतो, त्याच्या स्वतःच्या लोकांना बिनपगारी कामासाठी लावतो, आणि त्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना देत नाही.

  17. तो म्हणतो, ‘मी माझ्यासाठी एक भव्य राजवाडा बांधेन, ज्यामध्ये वरच्या मजल्यावर मोठमोठ्या खोल्या असतील.’ तो त्याला अनेक मोठ्या खिडक्या बांधतो, गंधसरूची तक्तपोशी करतो आणि सुंदर लाल रंगाने सजवितो.

  18. “तू गंधसरूचा जास्तीत जास्त वापर केला तर ते तुला राजा बनविल काय? तुझा पिता खातपीत नव्हता काय? त्याने जे योग्य आणि न्याय्य केले, म्हणून त्याचे सर्व चांगलेच झाले.

  19. त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, म्हणून त्याचे सर्व भले झाले. मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” असे याहवेह म्हणतात.

  20. “परंतु तुझे डोळे आणि तुझे अंतःकरण केवळ अनीतीने धन कसे मिळवावे, निर्दोष्यांचे रक्त कसे वाहवे, आणि जुलूम व अन्यायाने कसे बळकावे याचाच शोध घेत असतात.”

  21. म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात: “त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’ त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’

  22. त्याला मेलेल्या गाढवासारखी मूठमाती देण्यात येईल— त्याला सिंहासनावरून फरफटत आणून यरुशलेमच्या द्वाराबाहेर फेकतील!”

  23. तेव्हा यहोयाकीम राजाने अकबोरचा पुत्र एलनाथान व बरोबर काही माणसे देऊन त्यांना इजिप्त देशी पाठविले.

  24. इजिप्त देशातून त्यांनी उरीयाहला परत आणले, त्याला राजा यहोयाकीम राजाकडे परत आणले, त्याने त्याला तलवारीने ठार मारले आणि ज्या ठिकाणी सामान्य लोक पुरले होते तिथे त्याचा मृतदेह फेकून दिला.)

  25. यहूदीयाचा राजा यहोयाकीमच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमला वेढा दिला.