मुख्य मजकुरावर जा

Jehoahaz

8 वचने · 5 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Shallum

Jehoahaz चा उल्लेख असलेली वचने

  1. योशीयाहच्या सेवकांनी त्याचे प्रेत रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमास आणले आणि त्याला त्याच्या कबरेत पुरण्यात आले. आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजचा अभिषेक करून त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.

  2. वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.

  3. फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला.

  4. योशीयाहचे पुत्र: ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकीम, तिसरा सिद्कीयाह, व चौथा शल्लूम.

  5. आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजला यरुशलेमात त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.

  6. वयाच्या तेवीसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले.

  7. इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदीया आणि यरुशलेमचा राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु नखोने एल्याकीमचा भाऊ यहोआहाजाला घेऊन इजिप्तमध्ये नेले.

  8. यहूदीयाचा राजा योशीयाह याचा पुत्र शल्लूम याच्यानंतर गादीवर बसला, पण त्याला या ठिकाणाहून नेण्यात आले, त्याबद्दल याहवेह म्हणाले: “पुन्हा तो कधीच परत येणार नाही.