- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Pharaoh बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अब्राम इजिप्तमध्ये आला तेव्हा इजिप्तच्या लोकांनी पाहिले की साराय ही अतिशय सुंदर स्त्री आहे.
जेव्हा फारोह राजाच्या सरदारांनी तिला पाहिले तेव्हा त्यांनी फारोहजवळ तिची प्रशंसा केली; आणि तिला राजवाड्यात नेण्यात आले.
मग फारोहने तिच्यामुळे अब्रामाला मेंढरे, बैल, गाढवे, उंट तसेच गुलाम स्त्री व पुरुष अशा पुष्कळ देणग्या दिल्या.
परंतु याहवेहने अब्रामाची पत्नी साराय तिथे असल्यामुळे फारोहच्या घरावर भयंकर पीडा पाठविली.
तेव्हा फारोहने अब्रामाला बोलाविले आणि म्हटले, “तू माझ्याशी हे काय केले आहेस? ती तुझी पत्नी आहे हे तू मला आधी का सांगितले नाहीस?
‘ती माझी बहीण आहे,’ असे तू का सांगितलेस? म्हणूनच तिला माझी पत्नी करण्यास मी तयार झालो होतो. ही तुझी पत्नी घे आणि येथून निघून जा!”
आणि फारोहने आपल्या अधिकार्यांना आदेश देऊन अब्रामाची पत्नी, कुटुंबीय मंडळी व मालमत्ता यासह त्याची देशाबाहेर रवानगी केली.
शलोमोनने इजिप्तचा राजा फारोह याच्याशी सोयरीक केली व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्याने तिला दावीदाच्या शहरात आणले आणि आपला राजवाडा, याहवेहचे मंदिर, यरुशलेमच्या सभोवतीचा कोट बांधून होईपर्यंत त्याने तिला तिथेच ठेवले.
(इजिप्तचा राजा फारोहने गेजेरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते. त्याने त्याला आग लावली व त्यातील कनानी रहिवाशांना मारून टाकले व ते नगर आपली कन्या, शलोमोनच्या पत्नीला तिच्या लग्नाची भेट म्हणून दिले.
परंतु हदाद, जो अजूनही कोवळा मुलगा होता, काही एदोमी अधिकारी, ज्यांनी त्याच्या पित्याची सेवा केली होती, त्यांच्याबरोबर इजिप्तमध्ये पळून गेला.
ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.
फारोह हदादवर इतका प्रसन्न झाला की त्याने आपली पत्नी, तहपनीस राणीची बहीण त्याला पत्नी म्हणून दिली.
तहपनीसच्या बहिणीकडून त्याला गेनुबाथ नावाचा एक पुत्र झाला, ज्याचे संगोपन तहपनीसने राजवाड्यात केले. गेनुबाथ तिथे स्वतः फारोहच्या लेकरांबरोबर राहिला.
इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकले की दावीद आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आहे आणि सैन्याचा अधिकारी योआब देखील मरण पावला होता. तेव्हा हदाद फारोहला म्हणाला, “मी आपल्या स्वदेशास जावे म्हणून मला जाऊ द्यावे.”
फारोहने त्याला विचारले, “येथे तुला काय कमी आहे की तू आपल्या देशाला जाऊ इच्छितोस?” हदाद म्हणाला, “काही कमी नाही, पण मला जाऊ द्यावे!”
पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.
योशीयाह राजा असताना, इजिप्तचा राजा फारोह नखो हा अश्शूरच्या राजाला मदत करण्यासाठी फरात नदीजवळ गेला. योशीयाह राजा त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला, परंतु नखो राजाने त्याचा सामना केला आणि मगिद्दो येथे त्याला मारून टाकले.
योशीयाहच्या सेवकांनी त्याचे प्रेत रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमास आणले आणि त्याला त्याच्या कबरेत पुरण्यात आले. आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजचा अभिषेक करून त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.
वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.
त्याने आपल्या पूर्वजांच्या प्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.
फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला.
यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले.
इजिप्तचा राजा पुन्हा कधीही आपल्या देशातून बाहेर आला नाही, कारण बाबेलच्या राजाने इजिप्तच्या ओहोळापासून फरात नदीपर्यंतचा त्याचा सर्व प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला होता.
मेरेदने इजिप्तचा राजा फारोहची राजकन्या बिथ्याशी विवाह केला होता. यहूदाह गोत्रातील त्याच्या पत्नीने गदोरचा पिता येरेद, सोकोहचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथिएल यांना जन्म दिला.