Skip to content

Egypt

8 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: waters

31.0300, 33.8500 गूगल नकाशावर पाहा

Egypt चा उल्लेख असलेली वचने

  1. आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल.

  2. नंतर पुढे जाऊन ती आजमोनच्या बाजूने इजिप्तच्या ओढ्यापर्यंत जाऊन, त्या ओढ्याच्या कडेने ती भूमध्य समुद्रापर्यंत गेली होती. ही त्यांची दक्षिणी सीमा आहे.

  3. अश्दोद व त्याच्या सभोवतालच्या वस्त्या व गावे, गाझा, त्याच्या वस्त्या व गावे, इजिप्तच्या नाल्यापर्यंतची गावे व भूमध्य समुद्राच्या काठापर्यंत.

  4. तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर त्यावेळी सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे रहिवासी आले होते. त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वरापुढे सात दिवस व आणखी सात दिवस असे मिळून चौदा दिवस उत्सव साजरा केला.

  5. इजिप्तचा राजा पुन्हा कधीही आपल्या देशातून बाहेर आला नाही, कारण बाबेलच्या राजाने इजिप्तच्या ओहोळापासून फरात नदीपर्यंतचा त्याचा सर्व प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला होता.

  6. तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर सात दिवस सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे राहिवासी आले होते.

  7. त्या दिवशी याहवेह वाहत्या फरात नदीपासून इजिप्तच्या खोऱ्यापर्यंत मळणी करतील आणि तुम्ही, इस्राएल एकएक करून गोळा केले जाल.

  8. दक्षिणेच्या बाजूने वतनसीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत असेल व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत. ही दक्षिणेकडील सीमा.