Skip to content

Pharaoh

9 वचने · 2 कुटुंब सदस्य

Pharaoh चा उल्लेख असलेली वचने

  1. शलोमोनने इजिप्तचा राजा फारोह याच्याशी सोयरीक केली व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्याने तिला दावीदाच्या शहरात आणले आणि आपला राजवाडा, याहवेहचे मंदिर, यरुशलेमच्या सभोवतीचा कोट बांधून होईपर्यंत त्याने तिला तिथेच ठेवले.

  2. (इजिप्तचा राजा फारोहने गेजेरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते. त्याने त्याला आग लावली व त्यातील कनानी रहिवाशांना मारून टाकले व ते नगर आपली कन्या, शलोमोनच्या पत्नीला तिच्या लग्नाची भेट म्हणून दिले.

  3. शलोमोन राजा, फारोहच्या कन्येशिवाय मोआबी, अम्मोनी, एदोमी, सीदोनी व हिथी या परदेशीय स्त्रियांवर देखील प्रेम करत होता.

  4. ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.

  5. फारोह हदादवर इतका प्रसन्न झाला की त्याने आपली पत्नी, तहपनीस राणीची बहीण त्याला पत्नी म्हणून दिली.

  6. तहपनीसच्या बहिणीकडून त्याला गेनुबाथ नावाचा एक पुत्र झाला, ज्याचे संगोपन तहपनीसने राजवाड्यात केले. गेनुबाथ तिथे स्वतः फारोहच्या लेकरांबरोबर राहिला.

  7. इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकले की दावीद आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आहे आणि सैन्याचा अधिकारी योआब देखील मरण पावला होता. तेव्हा हदाद फारोहला म्हणाला, “मी आपल्या स्वदेशास जावे म्हणून मला जाऊ द्यावे.”

  8. फारोहने त्याला विचारले, “येथे तुला काय कमी आहे की तू आपल्या देशाला जाऊ इच्छितोस?” हदाद म्हणाला, “काही कमी नाही, पण मला जाऊ द्यावे!”

  9. शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.”