Skip to content

Hadad बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. नंतर याहवेहने एदोमी राजघराण्यातील एदोम हदाद याला शलोमोनचा शत्रू म्हणून उभे केले.

  2. काही वर्षापूर्वी योआबाचा सेनापती एदोम, जो मृतांना पुरण्यास गेला होता, तेव्हा दावीदाने त्याच्याशी युद्ध केले होते आणि एदोमातील सर्व पुरुषांना मारून टाकले होते.

  3. एदोमातील सर्व पुरुषांना मारेपर्यंत योआब व सर्व इस्राएली लोक सहा महिने तिथेच राहिले.

  4. परंतु हदाद, जो अजूनही कोवळा मुलगा होता, काही एदोमी अधिकारी, ज्यांनी त्याच्या पित्याची सेवा केली होती, त्यांच्याबरोबर इजिप्तमध्ये पळून गेला.

  5. ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.

  6. फारोह हदादवर इतका प्रसन्न झाला की त्याने आपली पत्नी, तहपनीस राणीची बहीण त्याला पत्नी म्हणून दिली.

  7. तहपनीसच्या बहिणीकडून त्याला गेनुबाथ नावाचा एक पुत्र झाला, ज्याचे संगोपन तहपनीसने राजवाड्यात केले. गेनुबाथ तिथे स्वतः फारोहच्या लेकरांबरोबर राहिला.

  8. इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकले की दावीद आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आहे आणि सैन्याचा अधिकारी योआब देखील मरण पावला होता. तेव्हा हदाद फारोहला म्हणाला, “मी आपल्या स्वदेशास जावे म्हणून मला जाऊ द्यावे.”

  9. फारोहने त्याला विचारले, “येथे तुला काय कमी आहे की तू आपल्या देशाला जाऊ इच्छितोस?” हदाद म्हणाला, “काही कमी नाही, पण मला जाऊ द्यावे!”