Skip to content

Megiddo बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तानखाचा राजा-एक, मगिद्दोचा राजा-एक,

  2. इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).

  3. “राजे आले, ते लढले, कनानाचे राजे लढले, मगिद्दोच्या झर्‍याजवळ तानख येथे लढले, त्यांनी चांदीची लूट घेतली नाही.

  4. अहीलुदचा पुत्र बाअनाकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश;

  5. शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकाम, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे.

  6. काय झाले ते पाहून, जेव्हा यहूदीयाचा राजा अहज्याह बेथ-हागानकडे जाणार्‍या मार्गाने पळाला. येहू त्याचा पाठलाग करता करता ओरडून म्हणाला, “त्यालाही मारा!” मग त्यांनी त्याला इब्लामजवळच्या गुर येथील चढणीवर रथातच घायाळ केले; तो मगिद्दोपर्यंत पळाला आणि तिथे तो मरण पावला.

  7. योशीयाह राजा असताना, इजिप्तचा राजा फारोह नखो हा अश्शूरच्या राजाला मदत करण्यासाठी फरात नदीजवळ गेला. योशीयाह राजा त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला, परंतु नखो राजाने त्याचा सामना केला आणि मगिद्दो येथे त्याला मारून टाकले.

  8. योशीयाहच्या सेवकांनी त्याचे प्रेत रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमास आणले आणि त्याला त्याच्या कबरेत पुरण्यात आले. आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजचा अभिषेक करून त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.

  9. त्याप्रमाणेच मनश्शेहच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची गावे, तानख व त्याची गावे, मगिद्दो व त्याची गावे, दोर व त्याची गावे होती. यात इस्राएलचा पुत्र योसेफाचे वंशज राहात.

  10. तरीसुद्धा, योशीयाह त्याच्यापासून मागे फिरला नाही, परंतु त्याला युद्धात गुंतवून ठेवण्यासाठी त्याने स्वतःचे वेषांतर केले. परमेश्वराच्या आज्ञेनुसार नखोने जे सांगितले, ते त्याने ऐकले नाही, परंतु तो मगिद्दोच्या मैदानावर त्याच्याबरोबर लढण्यासाठी गेला.

  11. तेव्हा धनुर्धऱ्यांनी योशीयाह राजाला बाण मारला, त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले, “मला घेऊन जा; मी अत्यंत जखमी झालो आहे.”

  12. तेव्हा त्यांनी योशीयाहला त्याच्या रथातून बाहेर काढले, त्याला त्याच्या दुसऱ्या रथात ठेवले आणि यरुशलेमास आणले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरांमध्ये पुरण्यात आले आणि सर्व यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांनी त्याच्यासाठी शोक केला.

  13. त्या दिवशी यरुशलेमातील आकांत इतका मोठा असेल, जसा मगिद्दोच्या खोर्‍यात ठार झालेल्या हदाद-रिम्मोनासाठी होता.