Jehoiachin
हे नावानेही ओळखले जाते: Jeconiah, Jechonias, Coniah
Jehoiachin चा उल्लेख असलेली वचने
यहोयाकीम आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.
वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला, आणि त्याने यरुशलेमात तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहूष्टा होते. ती एलनाथानची कन्या असून यरुशलेमची होती.
यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.
नबुखद्नेस्सर यहोयाखीनला बंदी करून बाबेलला घेऊन गेला. त्याने राजाची आई, त्याच्या पत्नी, त्याचे अधिकारी आणि देशातील प्रतिष्ठित लोकांना देखील यरुशलेमहून बाबेलला नेले.
यहूदीयाचा राजा यहोयाखीनच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनची बंदिवासातून सुटका केली. त्याने हे बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी केले.
यहोयाकीमाचे पुत्र: यकोन्याह, व सिद्कीयाह.
बंदी झालेले यकोन्याहचे पुत्र: शल्तीएल,
यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने केलेल्या घृणास्पद गोष्टी आणि त्याच्याविरुद्ध जे काही होते, ते सर्व इस्राएली आणि यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.
वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात तीन महिने दहा दिवस राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमातील यहूदीयाचा राजा यकोन्याह च्याबरोबर व इतर अनेकांना बाबेलला बंदिवासात नेले, तेव्हा मर्दखय यालाही पकडून नेले.
“मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,
हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा कोणालाही नको असलेली वस्तू नाही का? तो व त्याच्या मुलांना त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले.
बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीमचा पुत्र यकोन्याह, याच्यासह यहूदीया व यरुशलेम येथील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना बाबिलोन येथे कैद करून नेले,
आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”
(राजा यकोन्याह, राजमाता, न्यायालयातील अधिकारी, यहूदाहचे व यरुशलेमचे अधिकारी व कारागीर अशा सर्वांना यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेण्यात आले होते.)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहोयाकीमचा पुत्र कोन्याह याची यहूदीयाचा नवा राजा म्हणून नेमणूक केली नाही. त्याऐवजी त्याने योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याची निवड केली.
यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले.
यहोयाकीन राजाच्या बंदिवासाच्या पाचव्या वर्षी; महिन्याच्या पाचव्या दिवशी;
योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.
बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर: यखन्या शल्तीएलचा पिता, शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता,