Skip to content

Manasseh

24 वचने · 4 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Manasses

Manasseh चा उल्लेख असलेली वचने

  1. हिज्कीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.

  2. वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबाह होते.

  3. परंतु लोकांनी ऐकले नाही. मनश्शेहने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणून त्यांनी ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता अशा राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.

  4. “यहूदीयाचा राजा मनश्शेह यानेही अमंगळ कृत्ये केली आहेत. एवढेच नाही, त्याने त्याच्या आधीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्ट कर्मे केली आहेत आणि त्याने यहूदी लोकांना आपल्या मूर्तींसाठी तेच पाप करण्यास लावले.

  5. शिवाय, मनश्शेहने इतके निष्पाप रक्त सांडले की यरुशलेम पूर्ण रक्ताने भरून गेले—त्याने यहूदाहला जे पाप करावयाला लावले होते त्या शिवाय त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.

  6. मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले आणि त्याने जे पाप केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिल्या नाहीत काय?

  7. मनश्शेह आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला त्याच्या राजवाड्याच्या बागेत, उज्जाच्या बागेत पुरण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या पुत्र आमोन राज्य करू लागला.

  8. त्याने आपला पिता मनश्शेहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  9. यहूदीयाच्या राजांनी राजवाड्यात आहाज राजाच्या खोलीच्या छतावर उभारलेल्या वेद्याही त्याने पाडून टाकल्या. याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेहने बांधलेल्या वेद्या सुद्धा त्याने नष्ट केल्या. त्यांचा चुराडा करून त्यांची धूळ त्याने किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिली.

  10. इतके होऊनही यहूदीयाच्या विरुद्ध आलेला याहवेहचा महाक्रोध कमी झाला नव्हता, मनश्शेह राजाने जी दुष्टता केली होती त्यामुळे त्यांचा यहूदाहवरचा राग कमी झाला नाही.

  11. निश्चितच याहवेहच्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना आपल्या उपस्थितीतून घालून द्यावे म्हणून हे संकट यहूदीयावर आले, कारण मनश्शेहचे पाप आणि त्याने जे सर्व केले,

  12. त्याचा पुत्र आहाज, त्याचा पुत्र हिज्कीयाह, त्याचा पुत्र मनश्शेह,

  13. हिज्कीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या वंशजांबरोबर डोंगरावरील कबरेत पुरण्यात आले. तो मरण पावला तेव्हा सर्व यहूदीया व यरुशलेमच्या लोकांनी त्याचा सन्मान केला. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.

  14. वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले.

  15. परंतु मनश्शेहने यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना मार्गभ्रष्ट केले, ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता, त्या राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.

  16. याहवेह मनश्शेह आणि त्याच्या लोकांशी बोलले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

  17. तेव्हा याहवेहनी अश्शूर राजाच्या सेनापतींना त्यांच्याविरुद्ध केले, त्यांनी मनश्शेहला कैद केले, त्याच्या नाकात आकडा घातला, त्याला कास्य धातूच्या बेड्यांनी बांधले आणि बाबेलला नेले.

  18. आणि जेव्हा त्याने त्यांच्याकडे प्रार्थना केली, तेव्हा याहवेहना त्याच्या कळकळीच्या विनंतीमुळे दया आली आणि त्यांनी त्याची विनंती ऐकली; म्हणून त्यांनी त्याला यरुशलेम आणि त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा मनश्शेहला उमजले की, याहवेह हेच परमेश्वर आहेत.

  19. मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने त्याच्या परमेश्वराकडे केलेली प्रार्थना आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्या नावामध्ये संदेष्ट्यांनी सांगितलेली वचने ही इस्राएली राजांच्या पुस्तकात लिहिल्या आहेत.

  20. मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला.

  21. त्याने आपला पिता मनश्शेह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. मनश्शेहने तयार केलेल्या त्या सर्व मूर्तींची आमोनने पूजा केली आणि त्यांना बलिदाने अर्पण केली.

  22. परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले.

  23. यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल.

  24. हिज्कीयाह मनश्शेहचा पिता, मनश्शेह आमोनाचा पिता, आमोन योशीयाहचा,