Skip to content

Altar बद्दल बायबलमधील वचने

73 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘माझ्यासाठी मातीची वेदी तयार करा व त्यावर तुमची मेंढरे, बोकडे व तुमचे गुरे चढवून आपली होमार्पणे व शांत्यर्पणे ही अर्पण करा. जिथे कुठे माझ्या नावाचे गौरव व्हावा असे मी ठरवेन, तिथे मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन.

  2. तुम्ही माझ्यासाठी जर दगडाची वेदी बांधली, तर त्यासाठी घडविलेले दगड वापरू नयेत. त्यावर कोणतेही हत्यार वापरले तर तुम्ही त्यास विटाळून टाकाल.

  3. आपली नग्नता उघडी पडू नये म्हणून माझ्या वेदीवर पायर्‍या चढून जाऊ नका.’

  4. “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार करावी.

  5. ती चौरस असावी आणि तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात असावी. तिची शिंगे तिच्याशी अखंड असावी.

  6. तिचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याभोवती सोन्याचा काठ करावा.

  7. वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या कराव्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या असाव्या.

  8. दांडे बाभळीच्या लाकडाचे करून त्याला सोन्याचे आवरण द्यावे.

  9. कराराच्या कोशासमोर लावलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूस, प्रायश्चिताचे झाकण जे कराराच्या नियमाच्या पाटींवर आहे; तिथे वेदी ठेवावी; तिथेच मी तुला भेटत जाईन.

  10. “रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा.

  11. पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्‍या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा.

  12. या वेदीवर इतर कोणताही धूप, होमार्पण, अन्नार्पण किंवा पेयार्पण करू नये.

  13. अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्‍या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे.”

  14. त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश,

  15. मेज व त्याचे सामान, दीपस्तंभ व त्याची उपकरणे, धूपवेदी,

  16. मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती.

  17. त्यांनी वेदीचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण घातले व त्याभोवती सोन्याचा काठ केला.

  18. त्यांनी वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या बनविल्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या केल्या.

  19. त्यांनी ते दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले व त्यांना सोन्याचे आवरण घातले.

  20. कराराच्या नियमाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेवावी आणि निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा लावावा.

  21. मग मोशेने सभामंडपात, पडद्याच्या समोर सोन्याची वेदी ठेवली

  22. व याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे वेदीवर सुगंधी धूप जाळला.

  23. नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्‍ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.

  24. त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.

  25. मग मोशेने त्या गोर्‍ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्‍ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली.