मुख्य मजकुरावर जा

Altar बद्दल बायबलमधील वचने: Mosaic commandments prescribing the construction of

9 वचने · 11 पैलू

Mosaic commandments prescribing the construction of बद्दल वचने

  1. “ ‘माझ्यासाठी मातीची वेदी तयार करा व त्यावर तुमची मेंढरे, बोकडे व तुमचे गुरे चढवून आपली होमार्पणे व शांत्यर्पणे ही अर्पण करा. जिथे कुठे माझ्या नावाचे गौरव व्हावा असे मी ठरवेन, तिथे मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन.

  2. तुम्ही माझ्यासाठी जर दगडाची वेदी बांधली, तर त्यासाठी घडविलेले दगड वापरू नयेत. त्यावर कोणतेही हत्यार वापरले तर तुम्ही त्यास विटाळून टाकाल.

  3. आपली नग्नता उघडी पडू नये म्हणून माझ्या वेदीवर पायर्‍या चढून जाऊ नका.’

  4. याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे एक वेदी बांधावी, धोंड्यांची वेदी बांधावी. त्यावर कोणतेही लोखंडी अवजार वापरू नये.

  5. याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे न घडविलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधावी आणि मग त्या वेदीवर याहवेह तुमच्या परमेश्वराला होमार्पणे अर्पावी.

  6. तसेच शांत्यर्पणही त्याच वेदीवर करून याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने भोजन करावे.

  7. मग यहोशुआने याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासाठी एबाल पर्वतावर वेदी बांधली,

  8. जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली.

  9. “वेदीच्या लांबीचे हाताने माप याप्रकारे आहेत, म्हणजेच एक हात आणि चार बोटे: त्याच्या तळभागाचे माप एक हात खोल आणि एक हात रुंद होती, त्याचा कड व काठ याचे माप एक वीत होते आणि ही वेदीची उंची होती: