Skip to content

Altar बद्दल बायबलमधील वचने: Uses of

13 वचने · 11 पैलू

Uses of बद्दल वचने

  1. “रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा.

  2. पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्‍या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा.

  3. या वेदीवर इतर कोणताही धूप, होमार्पण, अन्नार्पण किंवा पेयार्पण करू नये.

  4. अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्‍या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे.”

  5. त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश,

  6. मेज व त्याचे सामान, दीपस्तंभ व त्याची उपकरणे, धूपवेदी,

  7. व याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे वेदीवर सुगंधी धूप जाळला.

  8. नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्‍ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.

  9. त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.

  10. मग मोशेने त्या गोर्‍ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्‍ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली.

  11. मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्‍ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले.

  12. याहवेहच्या वेदीसमोरील धुपाटण्यात जळते निखारे भरून घ्यावेत व कुटून बारीक केलेला व दोन मुठीत भरेल एवढा सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा.

  13. “मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.