Altar बद्दल बायबलमधील वचने: Pattern of
Pattern of बद्दल वचने
“धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार करावी.
ती चौरस असावी आणि तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात असावी. तिची शिंगे तिच्याशी अखंड असावी.
तिचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याभोवती सोन्याचा काठ करावा.
वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या कराव्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या असाव्या.
दांडे बाभळीच्या लाकडाचे करून त्याला सोन्याचे आवरण द्यावे.