Skip to content

Amon

15 वचने · 4 कुटुंब सदस्य

Amon चा उल्लेख असलेली वचने

  1. मनश्शेह आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला त्याच्या राजवाड्याच्या बागेत, उज्जाच्या बागेत पुरण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या पुत्र आमोन राज्य करू लागला.

  2. वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव मेशुल्लेमेथ असे होते, ती यटबाह हारूसची कन्या होती.

  3. आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाची त्याच्या राजवाड्यात हत्या केली.

  4. तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाहला त्याच्या जागेवर राजा केले.

  5. आमोनाच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, हे यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?

  6. त्याचा पुत्र आमोन, त्याचा पुत्र योशीयाह.

  7. मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला.

  8. वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले.

  9. त्याने आपला पिता मनश्शेह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. मनश्शेहने तयार केलेल्या त्या सर्व मूर्तींची आमोनने पूजा केली आणि त्यांना बलिदाने अर्पण केली.

  10. परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले.

  11. तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाह याला त्याच्या जागेवर राजा केले.

  12. यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले,

  13. गेली तेवीस वर्षे—यहूदीयाचा राजा आमोनचा पुत्र योशीयाह याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षापासून आजपर्यंत—याहवेह मला त्यांचे संदेश देत आले आहेत आणि मी तेच संदेश परत परत तुम्हाला सांगत आलो आहे, पण तुम्ही ते ऐकले नाहीत.

  14. सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्‍याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे:

  15. हिज्कीयाह मनश्शेहचा पिता, मनश्शेह आमोनाचा पिता, आमोन योशीयाहचा,