Skip to content

Abishai बद्दल बायबलमधील वचने

43 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?” अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.”

  2. तेव्हा दावीद आणि अबीशाई रात्रीच्या वेळेस सैन्याकडे गेले आणि शौल तिथे छावणीच्या आतमध्ये झोपलेला होता, त्याच्या उशाशी त्याचा भाला जमिनीमध्ये रोवलेला होता. अबनेर आणि सैनिक त्याच्याभोवती झोपलेले होते.

  3. अबीशाई दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझ्या शत्रूला आज तुझ्या हाती दिले आहे. तर आता मला भाल्याने त्याच्यावर एकच वार करून त्याला जमिनीत खुपसून टाकू द्या; दुसर्‍यांदा वार करावा लागणार नाही.”

  4. परंतु आता योआब आणि अबीशाई यांनी अबनेरचा पाठलाग केला, ते गिहाजवळच्या गिबोनच्या वाळवंटाकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या अम्माहच्या डोंगरावर येऊन पोहोचले तेव्हा सूर्यास्त होत होता.

  5. योआब व त्याचा भाऊ अबीशाई यांनी अबनेरला मारून टाकले, कारण त्याने गिबोनच्या लढाईत त्यांचा भाऊ असाहेलला मारले होते.

  6. बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठवले.

  7. जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा ते अबीशाईपुढून पळून शहरात गेले. तेव्हा योआब अम्मोनी सैन्याबरोबर युद्ध करून यरुशलेमास आला.

  8. तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.”

  9. दावीदाने एकतृतीयांश लोक योआबाच्या हाताखाली, एकतृतीयांश सैन्य योआबाचा भाऊ, जेरुइयाहचा पुत्र अबीशाईच्या हाताखाली आणि एकतृतीयांश इत्तय गित्तीच्या हाताखाली असे आपले सैन्य पाठवले. राजाने सैन्यास सांगितले, “मी स्वतः अवश्य तुम्हाबरोबर चालत जाईन.”

  10. राजाने योआब, अबीशाई व इत्तय यांना आज्ञा दिली, “माझ्यासाठी त्या तरुण अबशालोमशी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमविषयी प्रत्येक सेनापतीला दिलेली ही आज्ञा सर्व सैनिकांनी ऐकली.

  11. तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?”

  12. बिन्यामीन गोत्रातील बिकरीचा पुत्र शबा जो फार त्रासदायक होता, तो तिथे आला. त्याने रणशिंग फुंकले आणि ओरडून म्हणाला, “आम्हाला दावीदाबरोबर वाटा नाही, इशायच्या पुत्रामध्ये काही भाग नाही! इस्राएलातील प्रत्येकाने आपल्या तंबूत जावे!”

  13. तेव्हा बिकरीचा पुत्र शबाच्या मागे जाण्यासाठी इस्राएलच्या सर्व पुरुषांनी दावीदाला सोडून दिले. परंतु यार्देनपासून यरुशलेमपर्यंतचे यहूदाह गोत्राचे लोक त्यांच्या राजाबरोबर राहिले.

  14. दावीद जेव्हा यरुशलेमात त्याच्या राजवाड्यात परतला, तेव्हा त्याने राजवाड्याची व्यवस्था पाहण्यासाठी मागे ठेवलेल्या त्याच्या दहा उपपत्नींना घेऊन एका घरात देखरेखीत ठेवले आणि त्यांना सामुग्री पुरविली परंतु त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाही. त्यांच्या मरणाच्या दिवसापर्यंत, विधवांप्रमाणे बंदिवासात ठेवले.

  15. नंतर राजाने अमासाला म्हटले, “तीन दिवसात यहूदीयाच्या लोकांना माझ्याकडे जमा कर आणि तू स्वतः देखील हजर हो.”

  16. परंतु जेव्हा अमासा यहूदीयाच्या लोकांना जमा करण्यास गेला, तेव्हा राजाने त्याला ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्याने घेतला.

  17. तेव्हा दावीदाने अबीशाईला म्हटले, “अबशालोमाने केलेल्या हानीपेक्षा बिकरीचा पुत्र शबा आपले अधिक नुकसान करेल. तू तुझ्या स्वामीच्या माणसांना घे आणि त्याचा पाठलाग कर, नाहीतर त्याला तटबंदीची शहरे सापडतील आणि तो आपल्यापासून निसटून जाईल.”

  18. मग योआबाची माणसे आणि करेथी व पेलेथी आणि सर्व शूर योद्धे अबीशाईच्या नेतृत्वाखाली बाहेर निघाले. बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुशलेमातून बाहेर पडले.

  19. ते गिबोनातील मोठ्या खडकाजवळ आले, तेव्हा अमासा त्यांना भेटण्यास आला. योआबाने त्याचा लष्करी अंगरखा घातला होता आणि वरून कंबरपट्टा व म्यानात खंजीर होता. जसा तो पुढे गेला, त्याच्या म्यानातून खंजीर बाहेर पडला.

  20. योआब अमासाला अभिवादन करीत म्हणाला, “माझ्या भावा तू कसा आहेस?” असे म्हणत त्याने अमासाची दाढी उजव्या हाताने पकडून त्याचे चुंबन घेतले.

  21. अमासा योआबाच्या हातातील खंजिराविषयी सावध नव्हता आणि योआबाने तो त्याच्या पोटात खुपसला आणि त्याच्या आतड्या जमिनीवर पडल्या. पुन्हा वार न करताच अमास मरण पावला. नंतर योआब आणि त्याचा भाऊ अबीशाई यांनी बिकरीचा पुत्र शबाचा पाठलाग केला.

  22. तेव्हा योआबाच्या पुरुषांपैकी एकजण अमासाच्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला, “जो कोणी योआबाचे समर्थन करतो आणि जो कोणी दावीदाच्या बाजूने आहे, त्याने योआबाच्या मागे यावे!”

  23. अमासा भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात लोळत होता आणि त्या मनुष्याने पाहिले की, सर्व सैन्य स्तब्ध उभे होते. जेव्हा त्याला समजले की, प्रत्येकजण अमासापर्यंत येऊन थांबत होते, तेव्हा त्याने त्याला रस्त्यावरून ओढून शेतात नेले आणि त्याच्यावर एक वस्त्र टाकले.

  24. अमासाला रस्त्यावरून बाजूला काढल्यानंतर, सर्वजण योआबाबरोबर बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी निघाले.

  25. शबा इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून आबेल बेथ-माकाहपर्यंत व बेर्‍याच्या प्रदेशातून गेला आणि ते एकत्र येऊन त्याच्यामागे गेले.