Skip to content

Sheba

8 वचने · 1 कुटुंब सदस्य

Sheba चा उल्लेख असलेली वचने

  1. बिन्यामीन गोत्रातील बिकरीचा पुत्र शबा जो फार त्रासदायक होता, तो तिथे आला. त्याने रणशिंग फुंकले आणि ओरडून म्हणाला, “आम्हाला दावीदाबरोबर वाटा नाही, इशायच्या पुत्रामध्ये काही भाग नाही! इस्राएलातील प्रत्येकाने आपल्या तंबूत जावे!”

  2. तेव्हा बिकरीचा पुत्र शबाच्या मागे जाण्यासाठी इस्राएलच्या सर्व पुरुषांनी दावीदाला सोडून दिले. परंतु यार्देनपासून यरुशलेमपर्यंतचे यहूदाह गोत्राचे लोक त्यांच्या राजाबरोबर राहिले.

  3. तेव्हा दावीदाने अबीशाईला म्हटले, “अबशालोमाने केलेल्या हानीपेक्षा बिकरीचा पुत्र शबा आपले अधिक नुकसान करेल. तू तुझ्या स्वामीच्या माणसांना घे आणि त्याचा पाठलाग कर, नाहीतर त्याला तटबंदीची शहरे सापडतील आणि तो आपल्यापासून निसटून जाईल.”

  4. मग योआबाची माणसे आणि करेथी व पेलेथी आणि सर्व शूर योद्धे अबीशाईच्या नेतृत्वाखाली बाहेर निघाले. बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुशलेमातून बाहेर पडले.

  5. अमासा योआबाच्या हातातील खंजिराविषयी सावध नव्हता आणि योआबाने तो त्याच्या पोटात खुपसला आणि त्याच्या आतड्या जमिनीवर पडल्या. पुन्हा वार न करताच अमास मरण पावला. नंतर योआब आणि त्याचा भाऊ अबीशाई यांनी बिकरीचा पुत्र शबाचा पाठलाग केला.

  6. अमासाला रस्त्यावरून बाजूला काढल्यानंतर, सर्वजण योआबाबरोबर बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी निघाले.

  7. पण तसे काही नाही. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील एक मनुष्य, जो बिकरीचा पुत्र शबा याने दावीद राजाविरुद्ध आपला हात उगारला आहे. हा मनुष्य माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी शहर सोडून जाईन.” ती स्त्री योआबाला म्हणाली, “त्याचे शिर तुझ्याकडे तटावरून टाकले जाईल.”

  8. ती स्त्री आपल्या शहाणपणाचा हा सल्ला घेऊन सर्व लोकांकडे गेली आणि त्यांनी बिकरीचा पुत्र शबा याचे शिर कापून योआबाकडे फेकून दिले. तेव्हा योआबाने रणशिंग फुंकले आणि त्याचे लोक शहर सोडून आपआपल्या घरी निघून गेले. आणि योआब यरुशलेमास राजाकडे परत गेला.