मुख्य मजकुरावर जा

Shimei

15 वचने · 1 कुटुंब सदस्य

Shimei चा उल्लेख असलेली वचने

  1. दावीद राजा बहूरीमजवळ पोहोचताच, एक मनुष्य बाहेर आला, जो शौलाच्या घराण्यातील एका कुळातील होता. त्याचे नाव शिमी होते, तो गेराचा पुत्र होता, तो बाहेर येताच शाप देऊ लागला.

  2. शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो!

  3. दावीद आणि त्याची माणसे त्यांच्या वाटेने पुढे जात राहिले आणि शिमी त्यांच्या समोरच्या टेकडीकडून, दावीदाला शाप देत, त्याच्यावर दगडफेक करीत व त्याच्यावर धूळ उधळत चालत होता.

  4. यहूदीयाच्या लोकांबरोबर बहूरीम येथील बिन्यामीन गोत्रातील, गेराचा पुत्र शिमी हा सुद्धा घाईने दावीद राजाला भेटण्यासाठी गेला.

  5. राजाच्या घराण्याला घेण्यासाठी आणि राजाला हवे त्याप्रमाणे करण्यास, ते नदीचे पात्र पार करून आले. जेव्हा गेराचा पुत्र शिमी यार्देन पार करून आला, तेव्हा त्याने राजासमोर दंडवत घातले.

  6. तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?”

  7. तेव्हा राजाने शिमीला म्हटले, “तू मरणार नाहीस.” आणि राजाने त्याला शपथ घेऊन अभिवचन दिले.

  8. “आणि बहूरीम येथील बिन्यामीन गेराचा पुत्र शिमी तुमच्यात आहे हे विसरू नकोस, मी महनाईमकडे जाताना त्या दिवशी ज्याने मला भयंकर शाप दिला होता. पण जेव्हा तो मला यार्देनकडे भेटण्यास आला, तेव्हा ‘मी तुला तलवारीने ठार मारणार नाही’ अशी याहवेहच्या नावाने मी त्याला शपथ दिली होती.

  9. नंतर राजाने शिमीला बोलावून सांगितले, “तुझ्यासाठी यरुशलेमात घर बांध आणि तिथे राहा, इतर कुठेही जाऊ नकोस.

  10. शिमीने राजाला उत्तर दिले, “तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. माझे स्वामी जे म्हणतात त्याप्रमाणे आपला सेवक करेल.” आणि शिमी बराच काळ यरुशलेमात राहिला.

  11. परंतु तीन वर्षानंतर, शिमीचे दोन गुलाम, माकाहचा पुत्र आखीश, गथच्या राजाकडे पळून गेले आणि शिमीला सांगण्यात आले, “तुझे गुलाम गथमध्ये आहेत.”

  12. हे ऐकताच, त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि त्याच्या गुलामांचा शोध करीत आखीशकडे गथ येथे गेला. शिमीने जाऊन गथवरून आपल्या गुलामांना परत आणले.

  13. जेव्हा शलोमोनला सांगण्यात आले की शिमी यरुशलेमहून गथला गेला होता आणि परत आला आहे.

  14. तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले आणि त्याला म्हटले, “याहवेहसमोर तुझ्याकडून शपथ घेऊन तुला मी चेतावणी दिली नव्हती काय की, ‘तू यरुशलेम सोडून कुठेही जाशील त्या दिवशी खचितच तू मरशील’? त्यावेळी तू मला म्हणालास, ‘तुम्ही जे काही म्हणता ते बरे आहे, मी त्याप्रमाणे करेन.’

  15. पुढे राजा शिमीला म्हणाला, “माझे पिता दावीदाशी तू किती चुकीचा वागला हे तुला तुझ्या मनात ठाऊक आहे. याहवेहच तुला तुझ्या चुकीचा मोबदला देतील.