मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल २:२४सुमारे इ.स.पू. १०५३

    परंतु आता योआब आणि अबीशाई यांनी अबनेरचा पाठलाग केला, ते गिहाजवळच्या गिबोनच्या वाळवंटाकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या अम्माहच्या डोंगरावर येऊन पोहोचले तेव्हा सूर्यास्त होत होता.

  2. 2 शमुवेल २:२५सुमारे इ.स.पू. १०५३

    तेव्हा बिन्यामीनचे लोक अबनेरच्या मागे गेले. त्यांनी आपला एक गट तयार केला आणि एका टेकडीच्या शिखरावर उभे राहिले.

  3. 2 शमुवेल २:२६सुमारे इ.स.पू. १०५३

    अबनेरने योआबाला हाक मारत म्हटले, “तलवारीने सर्वकाळ नाश करावा काय? तुला समजत नाही काय की याचा शेवट कटुत्वात होणार? आपल्या सोबतीच्या इस्राएली लोकांचा पाठलाग करण्याचे थांबविण्यास तुझ्या लोकांस तू आज्ञा कधी देणार?”

  4. 2 शमुवेल २:२७सुमारे इ.स.पू. १०५३

    योआबने उत्तर दिले, “जिवंत परमेश्वराची शपथ, तू जर बोलला नसतास, तर माणसे सकाळपर्यंत त्यांचा पाठलाग करीत राहिली असती.”

  5. 2 शमुवेल २:२८सुमारे इ.स.पू. १०५३

    तेव्हा योआबने कर्णा वाजविला आणि सर्व सैन्य थांबले; त्यांनी पुढे इस्राएलचा पाठलाग केला नाही किंवा ते त्यांच्याशी पुन्हा लढलेही नाही.

  6. 2 शमुवेल २:२९सुमारे इ.स.पू. १०५३

    अबनेर आणि त्याची माणसे रात्रभर अराबाहमधून चालत गेली. त्यांनी यार्देन नदी पार केली, सकाळपर्यंत तसेच पुढे चालत राहिले आणि महनाईम येथे येऊन पोहोचले.

  7. 2 शमुवेल २:३०सुमारे इ.स.पू. १०५३

    नंतर योआबने अबनेरचा पाठलाग करण्याचे थांबविले आणि संपूर्ण सैन्याला एकत्र जमविले. असाहेल शिवाय दावीदाची एकोणवीस माणसे गहाळ होती.

  8. 2 शमुवेल २:३१सुमारे इ.स.पू. १०५३

    परंतु दावीदाच्या माणसांनी अबनेर बरोबर असलेल्या तीनशे साठ बिन्यामीन लोकांना मारले होते.

  9. 2 शमुवेल २:३२सुमारे इ.स.पू. १०५३

    त्यांनी असाहेलला घेतले आणि बेथलेहेम येथे त्याच्या वडिलांच्या कबरेत पुरले. नंतर योआब आणि त्याच्या माणसांनी रात्रभर प्रवास केला आणि पहाटेस हेब्रोनास येऊन पोहोचले.

  10. 2 शमुवेल ३:१सुमारे इ.स.पू. १०४८

    शौलाचे घराणे आणि दावीदाचे घराणे यांच्यामधील युद्ध फार काळ चालू होते. दावीदाचे घराणे अधिक अधिक बलवान होत गेले आणि शौलाचे घराणे अधिक अधिक दुर्बल होत गेले.

  11. 2 शमुवेल ३:२सुमारे इ.स.पू. १०४८

    हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता;

  12. 2 शमुवेल ३:३सुमारे इ.स.पू. १०४८

    त्याचा दुसरा पुत्र किलियाब, हा त्याला कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल हिच्यापासून झाला; तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमय याची कन्या माकाह हिच्यापासून झाला;

  13. 2 शमुवेल ३:४सुमारे इ.स.पू. १०४८

    चौथा पुत्र अदोनियाह हा हग्गीथपासून जन्मला; पाचवा पुत्र शफाट्याह हा अबीटालपासून झाला;

  14. 2 शमुवेल ३:५सुमारे इ.स.पू. १०४८

    आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाहपासून झाला.

  15. 2 शमुवेल ३:६सुमारे इ.स.पू. १०४८

    दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता.

  16. 2 शमुवेल ३:७सुमारे इ.स.पू. १०४८

    रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर शरीरसंबंध का केला?”

  17. 2 शमुवेल ३:८सुमारे इ.स.पू. १०४८

    तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे!

  18. 2 शमुवेल ३:९सुमारे इ.स.पू. १०४८

    याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराला तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत.

  19. 2 शमुवेल ३:१०सुमारे इ.स.पू. १०४८

    आणि शौलाच्या घराण्याकडून राज्य हस्तांतरीत करून इस्राएल आणि यहूदीयावर दानपासून बेअर-शेबापर्यंत दावीदाचे सिंहासन स्थापित केले नाही तर परमेश्वर अबनेरशी अधिक कठोरपणे वागो.”

  20. 2 शमुवेल ३:११सुमारे इ.स.पू. १०४८

    इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता.

  21. 2 शमुवेल ३:१२सुमारे इ.स.पू. १०४८

    नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.”

  22. 2 शमुवेल ३:१३सुमारे इ.स.पू. १०४८

    दावीद म्हणाला, “ठीक आहे, मी तुझ्याबरोबर एक करार करेन. परंतु मी तुझ्याकडून एका गोष्टीची मागणी करतो: जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा शौलाची कन्या मीखल हिला घेऊन आल्याशिवाय माझ्यासमोर येऊ नकोस.”

  23. 2 शमुवेल ३:१४सुमारे इ.स.पू. १०४८

    नंतर दावीदाने शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “माझी पत्नी मीखल मला दे, जिला मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा किंमत देऊन वाग्दत्त करून घेतली.”

  24. 2 शमुवेल ३:१५सुमारे इ.स.पू. १०४८

    तेव्हा इश-बोशेथने हुकूम करून मीखलला तिचा पती, लईशचा पुत्र पलतीएलपासून आणले.

  25. 2 शमुवेल ३:१६सुमारे इ.स.पू. १०४८

    तरीही तिचा पती रडत तिच्यामागे बहूरीमपर्यंत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत घरी जा!” तेव्हा तो परत गेला.