मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल १:२६सुमारे इ.स.पू. १०५३

    योनाथान माझ्या भावा, मी तुझ्यासाठी शोक करतो; तू मला फार प्रिय होतास. माझ्यावरील तुझे प्रेम अद्भुत असे होते, स्त्रीच्या प्रेमापेक्षा ते अधिक अद्भुत होते!

  2. 2 शमुवेल १:२७सुमारे इ.स.पू. १०५३

    “पाहा, बलवान कसे पडले आहेत! युद्धाची शस्त्रे नष्ट झाली आहेत!”

  3. त्या दरम्यान, दावीदाने याहवेहला विचारले, “यहूदीयाच्या एखाद्या गावात मी जाऊ काय?” तेव्हा याहवेह म्हणाले, “जा.” दावीदाने विचारले, “मी कुठे जावे?” याहवेहने उत्तर दिले, “हेब्रोनास जा.”

  4. तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला.

  5. दावीद त्याच्या बरोबरच्या प्रत्येक माणसांना त्यांच्या कुटुंबासह घेऊन गेला आणि त्यांनी हेब्रोन व तेथील गावांमध्ये वस्ती केली.

  6. तेव्हा यहूदीयातील माणसे हेब्रोनास आली व तिथे त्यांनी दावीदाचा यहूदाहच्या गोत्राचा राजा म्हणून अभिषेक केला. जेव्हा दावीदाला सांगण्यात आले की, ज्या लोकांनी शौलाला पुरले ते याबेश-गिलआदचे लोक होते,

  7. तेव्हा दावीदाने याबेश-गिलआदवासियांकडे दूत पाठवून म्हटले, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो, कारण तुम्ही आपला धनी शौल यांना पुरून त्यांच्याप्रित्यर्थ दया दाखविली आहे.

  8. तर आता याहवेह आपली दया व विश्वासूपणा तुम्हाला प्रगट करो आणि तुम्ही हे केले आहे म्हणून मी सुद्धा अशीच कृपा तुम्हावर करेन.

  9. तर आता हिंमत ठेवा आणि धैर्य धरा, कारण शौल तुमचा धनी मरण पावला आहे आणि यहूदीयाच्या लोकांनी त्यांचा राजा म्हणून माझा अभिषेक केला आहे.”

  10. त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.

  11. त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

  12. शौलाचा पुत्र इश-बोशेथ इस्राएल देशाचा राजा झाला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. मात्र यहूदाहचे गोत्र दावीदाशी एकनिष्ठ राहिले.

  13. हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता.

  14. 2 शमुवेल २:१२सुमारे इ.स.पू. १०५३

    नेरचा पुत्र अबनेर शौलाचा पुत्र इश-बोशेथच्या माणसांबरोबर एकत्र येऊन महनाईम सोडून गिबोनकडे गेले.

  15. 2 शमुवेल २:१३सुमारे इ.स.पू. १०५३

    जेरुइयाहचा पुत्र योआब आणि दावीदाची माणसे बाहेर पडली आणि गिबोनाच्या तळ्याकडे भेटली. एक गट तळ्याच्या एका बाजूला खाली बसला आणि दुसरा गट तळ्याच्या दुसर्‍या बाजूला बसला.

  16. 2 शमुवेल २:१४सुमारे इ.स.पू. १०५३

    तेव्हा अबनेर योआबाला म्हणाला, “काही तरुण पुरुषांनी उठून आमच्यापुढे समोरासमोर लढाई होऊ करावी.” “ठीक आहे, त्यांनी तसे करावे,” योआब म्हणाला.

  17. 2 शमुवेल २:१५सुमारे इ.स.पू. १०५३

    म्हणून ते उभे राहिले आणि त्यांची मोजणी करण्यात आली; बिन्यामीन आणि शौलाचा पुत्र इश-बोशेथ यांच्यातील बारा माणसे आणि बारा माणसे दावीदासाठी पुढे आले.

  18. 2 शमुवेल २:१६सुमारे इ.स.पू. १०५३

    नंतर प्रत्येकाने त्याच्या विरोधकाचे डोके पकडले आणि आपला सुरा विरोधकाच्या कुशीत खुपसला आणि ते मिळून पडले. म्हणून गिबोनातील त्या जागेला हेलकाथ-हज्जूरीम हे नाव पडले.

  19. 2 शमुवेल २:१७सुमारे इ.स.पू. १०५३

    त्या दिवशी तीव्र युद्ध झाले आणि अबनेर व इस्राएली सैन्य यांचा दावीदाच्या माणसांनी पराभव केला.

  20. 2 शमुवेल २:१८सुमारे इ.स.पू. १०५३

    जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता.

  21. 2 शमुवेल २:१९सुमारे इ.स.पू. १०५३

    असाहेलने अबनेरचा पाठलाग केला, त्याचा पाठलाग करताना तो उजवीकडे किंवा डावीकडे वळला नाही.

  22. 2 शमुवेल २:२०सुमारे इ.स.पू. १०५३

    अबनेरने मागे वळून पाहिले आणि विचारले, “तू असाहेल आहेस काय?” “होय, मी आहे,” त्याने उत्तर दिले.

  23. 2 शमुवेल २:२१सुमारे इ.स.पू. १०५३

    तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळ; एखाद्या तरुण पुरुषाला पकड आणि त्याची शस्त्रे काढून घे.” परंतु असाहेल त्याचा पाठलाग करण्याचे थांबवेना.

  24. 2 शमुवेल २:२२सुमारे इ.स.पू. १०५३

    अबनेरने पुन्हा असाहेलला चेतावणी दिली, “माझा पाठलाग करण्याचे थांबव! मी तुला का मारून टाकावे? तुझा भाऊ योआब याला मी आपले तोंड कसे दाखवू?”

  25. 2 शमुवेल २:२३सुमारे इ.स.पू. १०५३

    परंतु असाहेलने पाठलाग करण्याचे थांबविण्यास नाकारले; तेव्हा अबनेरने त्याच्या भाल्याचा दांडा असाहेलच्या पोटात खुपसला आणि तो भाला त्याच्या पोटातून जाऊन पाठीतून बाहेर आला. तो पडला आणि तिथेच मरण पावला. आणि प्रत्येकजण जे तिथून येत होते, ते असाहेल पडून मेला होता, तिथे थांबले.