- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1010–970 BC
The Reign of David
David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.
या कालखंडातील वचने
- 2 शमुवेल ३:१७सुमारे इ.स.पू. १०४८
अबनेरने इस्राएलच्या पुढार्यांबरोबर विचारविनिमय केला आणि म्हणाला, “दावीद तुमचा राजा व्हावा अशी काही काळापासून तुमची इच्छा होती.
- 2 शमुवेल ३:१८सुमारे इ.स.पू. १०४८
आता तसे करा! कारण याहवेहने दावीदाला अभिवचन दिले आहे, ‘माझा सेवक दावीद याच्याद्वारे माझ्या इस्राएली लोकांना मी पलिष्ट्यांच्या आणि त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवेन.’ ”
- 2 शमुवेल ३:१९सुमारे इ.स.पू. १०४८
अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले.
- 2 शमुवेल ३:२०सुमारे इ.स.पू. १०४८
जेव्हा अबनेर त्याच्या बरोबरच्या वीस माणसांना घेऊन दावीदाकडे हेब्रोनास आला, तेव्हा दावीदाने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी मेजवानी तयार केली.
- 2 शमुवेल ३:२१सुमारे इ.स.पू. १०४८
तेव्हा अबनेर दावीदाला म्हणाला, “मी जाऊन माझ्या धनीराजासाठी सर्व इस्राएली लोकांना एकत्र करेन, यासाठी की त्यांनी तुमच्याबरोबर एक करार करावा, मग आपल्या मनास येईल त्यांच्यावर आपण राज्य करावे” तेव्हा दावीदाने अबनेरला रवाना केले आणि तो शांतीने गेला.
- 2 शमुवेल ३:२२सुमारे इ.स.पू. १०४८
त्याचवेळेस दावीदाची माणसे आणि योआब छापा घालून परतले आणि आपल्याबरोबर मोठी लूट आणली. परंतु अबनेर दावीदाबरोबर हेब्रोनमध्ये नव्हता, कारण दावीदाने त्याला रवाना केले होते आणि तो शांतीने गेला होता.
- 2 शमुवेल ३:२३सुमारे इ.स.पू. १०४८
जेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सर्व सैनिक आले तेव्हा त्याला सांगितले गेले की, नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता आणि राजाने त्याला परत पाठवून दिले आणि तो शांतीने गेला होता.
- 2 शमुवेल ३:२४सुमारे इ.स.पू. १०४८
तेव्हा योआब राजाकडे गेला आणि म्हणाला, “आपण हे काय केले? पाहा, अबनेर आपणाकडे आला होता. आपण त्याला का जाऊ दिले? आता तो गेला आहे!
- 2 शमुवेल ३:२५सुमारे इ.स.पू. १०४८
आपणास नेराचा पुत्र अबनेर कसा आहे हे माहीत आहे; तो आपणास फसवायला आणि आपल्या हालचाली पाहण्यासाठी आणि आपण जे करता त्याचा अंदाज घेण्यासाठी आला होता.”
- 2 शमुवेल ३:२६सुमारे इ.स.पू. १०४८
नंतर योआब दावीदाकडून निघाला आणि त्याने अबनेरच्या मागे निरोप्यांना पाठवले आणि त्यांनी त्याला सिराहच्या विहिरीपासून परत आणले. परंतु दावीदाला हे माहीत नव्हते.
- 2 शमुवेल ३:२७सुमारे इ.स.पू. १०४८
जेव्हा अबनेर हेब्रोनास परत आला, तेव्हा योआबाने त्याला आतील खोलीत बाजूला नेले जसे की, त्याला त्याच्याबरोबर काही खाजगी बोलावयाचे आहे. आणि तिथे त्याचा भाऊ असाहेल याच्या रक्ताचा सूड घ्यावा म्हणून योआबने त्याच्या पोटावर वार केला आणि तो मरण पावला.
- 2 शमुवेल ३:२८सुमारे इ.स.पू. १०४८
नंतर जेव्हा दावीदाने याबद्दल ऐकले, तो म्हणाला, “मी आणि माझे राज्य नेराचा पुत्र अबनेर याच्या रक्ताबाबतीत याहवेहसमोर निर्दोष आहोत.
- 2 शमुवेल ३:२९सुमारे इ.स.पू. १०४८
त्याचे रक्तदोष योआब आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर असो! योआबच्या कुटुंबात स्रावी, महारोगी, कुबडीवर टेकलेला, तलवारीने पडणारा, अन्नावाचून राहणारा असा कोणी ना कोणी असल्याशिवाय राहणार नाही.”
- 2 शमुवेल ३:३०सुमारे इ.स.पू. १०४८
योआब व त्याचा भाऊ अबीशाई यांनी अबनेरला मारून टाकले, कारण त्याने गिबोनच्या लढाईत त्यांचा भाऊ असाहेलला मारले होते.
- 2 शमुवेल ३:३१सुमारे इ.स.पू. १०४८
नंतर दावीद योआबाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना म्हणाला, “तुमची वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरसमोर शोक करत चला.” दावीद राजा स्वतः तिरडीमागे चालला.
- 2 शमुवेल ३:३२सुमारे इ.स.पू. १०४८
त्यांनी अबनेरास हेब्रोनमध्ये पुरले आणि राजाने अबनेरच्या कबरेजवळ मोठ्याने आकांत केला. सर्व लोकसुद्धा रडले.
- 2 शमुवेल ३:३३सुमारे इ.स.पू. १०४८
राजाने अबनेरसाठी हे विलापगीत गाईले: “मूर्खाने मरावे तसे अबनेरने मरावे काय?
- 2 शमुवेल ३:३४सुमारे इ.स.पू. १०४८
तुझे हात बांधलेले नव्हते, तुझ्या पायसुद्धा बेड्यांमध्ये नव्हते. दुष्टासमोर एखादा पडावा तसा तू पडला.” आणि सर्व लोक त्याच्यासाठी पुन्हा रडले.
- 2 शमुवेल ३:३५सुमारे इ.स.पू. १०४८
नंतर त्या सर्वांनी येऊन दावीदाने दिवस असताच काही खावे अशी विनंती केली; पण दावीद शपथ घेत म्हणाला, “सूर्यास्ताच्या आधी मी भाकर किंवा काहीही सेवन केले, तर परमेश्वर मला कठोर शासन करोत!”
- 2 शमुवेल ३:३६सुमारे इ.स.पू. १०४८
सर्व लोकांनी हे लक्षात घेतले आणि त्यांना समाधान वाटले; राजाने जे सर्वकाही केले त्यात ते खचितच समाधानी झाले.
- 2 शमुवेल ३:३७सुमारे इ.स.पू. १०४८
त्या दिवशी तिथे असलेल्या सर्व लोकांना आणि सर्व इस्राएलला लक्षात आले की, नेराचा पुत्र अबनेर याला ठार मारण्यात राजाचा काही भाग नव्हता.
- 2 शमुवेल ३:३८सुमारे इ.स.पू. १०४८
नंतर राजा आपल्या माणसांना म्हणाला, “तुम्हाला लक्षात येत नाही काय की आज इस्राएलमध्ये एक सेनापती, एक महान पुरुष पडला आहे?
- 2 शमुवेल ३:३९सुमारे इ.स.पू. १०४८
आणि आज, मी अभिषिक्त राजा असूनही, निर्बल आहे आणि जेरुइयाहचे हे पुत्र माझ्यासाठी फारच शक्तिमान आहेत. याहवेह वाईट कृत्य करणाऱ्यास त्याच्या दुष्कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देवो!”
- 2 शमुवेल ४:१सुमारे इ.स.पू. १०४८
जेव्हा शौलाचा पुत्र इश-बोशेथ याने ऐकले की, अबनेर हेब्रोन येथे मरण पावला आहे, तेव्हा त्याचे धैर्य सुटले आणि सर्व इस्राएली सावध झाले.
- 2 शमुवेल ४:२सुमारे इ.स.पू. १०४८
इकडे शौलाच्या पुत्राकडे दोन माणसे होती, ते छापा घालणाऱ्या तुकड्यांचे पुढारी होते. एकाचे नाव बाअनाह आणि दुसऱ्याचे रेखाब असे होते; ते बिन्यामीन गोत्रातील, बैरोथ वंशाच्या रिम्मोनचे पुत्र होते, बैरोथ हा बिन्यामीनचा भाग समजला जातो,