मुख्य मजकुरावर जा

circa 1010–970 BC

The Reign of David

David unites the tribes, conquers Jerusalem, and establishes Israel's golden age—even through deep personal failure.

1,230 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 शमुवेल ५:१६सुमारे इ.स.पू. १०४८

    एलीशामा, एलयादा व एलिफेलेत.

  2. 2 शमुवेल ५:१७सुमारे इ.स.पू. १०४८

    इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो खाली गडाकडे गेला.

  3. 2 शमुवेल ५:१८सुमारे इ.स.पू. १०४८

    इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईमच्या खोर्‍यात पसरले.

  4. 2 शमुवेल ५:१९सुमारे इ.स.पू. १०४८

    तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, कारण मी नक्कीच पलिष्ट्यांना तुझ्या हातात देईन.”

  5. 2 शमुवेल ५:२०सुमारे इ.स.पू. १०४८

    तेव्हा दावीद बआल-पेरासीम येथे गेला आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे याहवेह माझ्या शत्रूंवर माझ्यासमोर तुटून पडले.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम हे नाव पडले.

  6. 2 शमुवेल ५:२१सुमारे इ.स.पू. १०४८

    पलिष्टी लोकांनी त्यांच्या मूर्त्या तिथेच टाकून दिल्या आणि दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या आपल्याबरोबर नेल्या.

  7. 2 शमुवेल ५:२२सुमारे इ.स.पू. १०४८

    पुन्हा एकदा पलिष्टी लोक आले आणि रेफाईमच्या खोर्‍यात पसरले.

  8. 2 शमुवेल ५:२३सुमारे इ.स.पू. १०४८

    तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले आणि त्यांनी उत्तर दिले, “सरळ वरती जाऊ नको, परंतु त्यांच्यामागून वळसा घे आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.

  9. 2 शमुवेल ५:२४सुमारे इ.स.पू. १०४८

    तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, त्वरित पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी याहवेह तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.”

  10. 2 शमुवेल ५:२५सुमारे इ.स.पू. १०४८

    तेव्हा दावीदाने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्याने पलिष्टी सैन्याला मारून टाकले.

  11. 2 शमुवेल ६:१सुमारे इ.स.पू. १०४२

    दावीदाने पुन्हा इस्राएलातील सर्व सक्षम तरुण माणसांना एकत्र आणले, ते तीस हजार होते.

  12. 2 शमुवेल ६:२सुमारे इ.स.पू. १०४२

    दावीद व त्याची सर्व माणसे, यहूदीयातील बालाह येथून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वराचा कोश, जे करुबांमध्ये आरूढ आहेत त्यांच्या नावाने ओळखला जात असे, तो कोश आणण्यासाठी निघाले.

  13. 2 शमुवेल ६:३सुमारे इ.स.पू. १०४२

    त्यांनी परमेश्वराचा कोश एका नवीन गाडीत ठेवला व तो डोंगरावर असलेल्या अबीनादाबाच्या घरातून बाहेर आणला. अबीनादाबाचे पुत्र उज्जा आणि अहियो नवीन गाडी चालवित होते

  14. 2 शमुवेल ६:४सुमारे इ.स.पू. १०४२

    अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता.

  15. 2 शमुवेल ६:५सुमारे इ.स.पू. १०४२

    दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर चिपळ्या, सनोवर लाकडापासून बनविलेले वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा वाजवित आनंद करीत होते.

  16. 2 शमुवेल ६:६सुमारे इ.स.पू. १०४२

    जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.

  17. 2 शमुवेल ६:७सुमारे इ.स.पू. १०४२

    त्याच्या या आदरहीन कृत्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला; म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले आणि तो तिथे परमेश्वराच्या कोशाच्या बाजूला मरण पावला.

  18. 2 शमुवेल ६:८सुमारे इ.स.पू. १०४२

    तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.

  19. 2 शमुवेल ६:९सुमारे इ.स.पू. १०४२

    त्या दिवशी दावीदाला याहवेहचे भय वाटले आणि तो म्हणाला, “आता याहवेहचा कोश माझ्याकडे कसा येणार?”

  20. 2 शमुवेल ६:१०सुमारे इ.स.पू. १०४२

    याहवेहचा कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात घेऊन जाण्यास त्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी, त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला.

  21. 2 शमुवेल ६:११सुमारे इ.स.पू. १०४२

    याहवेहचा कोश गित्ती ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याला आणि त्याच्या संपूर्ण घराण्यास आशीर्वाद दिला.

  22. 2 शमुवेल ६:१२सुमारे इ.स.पू. १०४२

    दावीद राजाला असे सांगण्यात आले की, “याहवेहने ओबेद-एदोमच्या घराण्यास व त्याचे जे काही आहे त्यास, परमेश्वराच्या कोशामुळे आशीर्वादित केले आहे,” तेव्हा परमेश्वराचा कोश ओबेद-एदोमच्या घरापासून दावीदाच्या नगरात आणावा म्हणून दावीद आनंद करीत गेला.

  23. 2 शमुवेल ६:१३सुमारे इ.स.पू. १०४२

    याहवेहचा कोश वाहून नेणारे जेव्हा सहा पावले पुढे गेले, तेव्हा त्याने एक बैल आणि एक पुष्ट वासरू यांचा यज्ञ केला.

  24. 2 शमुवेल ६:१४सुमारे इ.स.पू. १०४२

    तागाचे एफोद परिधान करून दावीद त्याच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर नाचत होता,

  25. 2 शमुवेल ६:१५सुमारे इ.स.पू. १०४२

    दावीद आणि सर्व इस्राएली लोक आनंदाचा जयघोष करीत आणि रणशिंगांचा नाद करीत याहवेहचा कोश आणत होते.