Skip to content

Sinai

20 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Sina

28.5300, 33.9700 गूगल नकाशावर पाहा

Sinai चा उल्लेख असलेली वचने

  1. आणि तिसर्‍या दिवशी तयार असावे, कारण त्या दिवशी याहवेह सर्व लोकांसमक्ष सीनाय पर्वतावर उतरून येतील.

  2. सीनाय पर्वत धुराने झाकून गेला होता, कारण याहवेह अग्निरुपात पर्वतावर उतरले होते. भट्टीतून निघावा तसा धूर उठला होता आणि सगळा पर्वत जोरात थरथरत होता.

  3. याहवेह सीनाय पर्वतावर उतरले व मोशेला पर्वतावर बोलाविले. मग मोशे वर गेला,

  4. तेव्हा मोशे याहवेहला म्हणाला, “लोक सीनाय पर्वताजवळ येऊ शकत नाहीत, कारण तुम्ही स्वतःच आम्हाला ताकीद दिली आहे, ‘पर्वताभोवती सीमा आखून आम्ही त्याला पवित्र ठेवावे.’ ”

  5. आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.

  6. जेव्हा याहवेहने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले, तेव्हा त्यांनी मोशेला कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या दिल्या, ज्या परमेश्वराच्या बोटाने कोरलेल्या होत्या.

  7. तू सकाळी तयार राहा आणि मग सीनाय पर्वतावर ये. तिथे डोंगरमाथ्यावर माझ्यासमोर स्वतःला सादर कर.

  8. मग मोशेने पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडवून घेतल्या आणि त्या दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेऊन याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोठ्या पहाटे सीनाय पर्वतावर गेला.

  9. जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही.

  10. यानंतर सर्व इस्राएली लोक त्याच्याजवळ आले आणि मोशेने त्यांना त्या सर्व आज्ञा दिल्या, ज्या याहवेहने सीनाय पर्वतावर त्याला दिल्या होत्या.

  11. सीनाय पर्वतावर याहवेहनी मोशेला सांगितले,

  12. हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या.

  13. या आज्ञा सीनाय पर्वतावर याहवेहने इस्राएली लोकांसाठी मोशेला दिल्या.

  14. सीनाय डोंगरावर याहवेह मोशेबरोबर बोलले, त्यावेळी अहरोन व मोशे यांची वंशावळी ही होती.

  15. सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे.

  16. “तुम्ही सीनाय पर्वतावर खाली उतरले; त्यांच्याशी स्वर्गातून बोलले; त्यांना न्याय्य व योग्य विधी व कायदे दिले आणि उत्तम नियम व आज्ञा दिल्या.

  17. “चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एक दूत मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून प्रकट झाला.

  18. तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने त्याला मिळाली.

  19. अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.

  20. आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे.